मुंबई- (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील ५३ वे मोफत आरोग्य शिबिर नुकतेच अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान , मुंबई जिल्हा कार्यालय , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसाहत (भोईवाडा बेस्ट कामगार वसाहत)जेरबाई वाडिया रोड परेल भोईवाडा मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते .
ह्या शिबिरास समाजसेवक श्री .शरद नाटेकर, शिव प्रसाद संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री .नरेंद्र मोहिते ,श्री. सदानंद घाडगे, ॲड. संजय डीचोलकर, श्री. राजेंद्र पवार, हर्षला पाटील, आर.डी .पवार, श्री.दीपक वाघ, अक्षरा संस्थेचे मुंबई समन्वयक श्री.संदीप मोहिते युनिकेअर हेल्थ सेंटर चे श्री .रमेश कांबळे समाजसेवक श्री.प्रकाश वाणी , श्री सचिन भांगे, श्री चंद्रकांत हळदणकर समाजसेवक मोहन वायदांडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या उपक्रमास श्री.प्रदीप मोहिते, अभिजित, अंकुश, सिद्धांत मोहिते,संकेत जाधव, स्नेहल मोहिते , दीपाली कांबळे , युनिकेअर हेल्थ सेंटर ह्याचे विशेष सहकार्य लाभले.तसेच ह्या आरोग्य शिबिरस स्थानिक मान्यवरांनी, स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली ह्या सर्वाचे व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यानी शिबिराचे उत्कृष्टपणे नियोजन केल्याबद्दल अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल वंजारे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा