आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

प.रा.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मयोगी व विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस घेतली मतदान जनजागृतीची शपथ...

भिवंडी (प्रतिनिधी सुनिल इंगळे ):भिवंडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत भिवंडी पश्चिम 136 विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी प.रा. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात काल 14 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती दिनाचे औचित्य साधून करण्यात आली होती. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मयोग्यांनी मतदान जनजागृती करणे बाबत शपथ घेतली.
   याच अनुषंगाने मा.श्री. प्रकाश राठोड ,सहाय्यक आयुक्त (शिक्षण)प.रा.विद्यालयाचे प्र. प्राचार्य विकास पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे CRC व प.रा.विद्यालयातील श्री पंकज भोईर, श्री देवेंद्र पाटील, श्री संतोष भोईर श्री सदाशिव गारळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थना 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्येक नागरिकांनी मतदान करावे यासाठी विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेणे व त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून पालकांची सही घेऊन येणे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकास आवर्जून मतदान करण्यासाठी आवाहन करणे आशा सूचना या प्रसंगी विद्यार्थ्यांना सह आयुक्त श्री प्रकाश राठोड साहेब यांनी दिल्या. तसेच शाळेमध्ये पथनाट्य छोटे सोशल मीडियासाठी रिल्स, रांगोळी स्पर्धा, असे विविध उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मतदानचा टक्का वाढण्यासाठी आमच्या शाळेत असे नियोजन करण्यात आले असे प्रा.श्री विकास पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...