मुंबई: सार्वजनिक पूजा समिती यंदा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने भांडुपगाव येथे सार्वजनिक पूजा समिती तर्फे ' अमृत दीप महोत्सव ' हा दिवाळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने चित्रकला, किल्ला, एकपात्री, वेशभूषा, गायन, लोकनृत्य अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई व राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मा. खासदार संजय दीना पाटील व मा. आमदार संजय राऊत यांच्या हस्ते पार पडला. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते श्री. परशुराम कोपरकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस श्री. महेश पाटील, उपाध्यक्ष धनंजय म्हात्रे, रमेश शेलार, खजिनदार सौ. उषा काकडे, सल्लागार श्री. गोविंद म्हात्रे, प्रा. जयवंत पाटील, उत्सव समितीचे अध्यक्षा सौ. सोनम कोपरकर, सरचिटणीस श्री. मयूर म्हात्रे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भावेश कोपरकर, विजय कडव, प्रशांत काकडे, हेमंत वाघिलकर, दिनेश कोपरकर, संजय उलवेकर, देविदास किणी, प्रविण पवार, दयानंद पवार, दिनेश कोपरकर, प्रमिला कोपरकर, राहुल खराटे, रजनी पाटील, सृष्टी वाघिलकर, वर्षा वाघिलकर, दीपाली पाटील, सरिता म्हात्रे, भारती किनी, चारुशीला पाटील, विशाखा भोईर, राजेंद्र गावकर, पल्लवी खारकर, प्रमिला कोपरकर, स्मिता मिसाळ, उमा मळेकर इ. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा