आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' मध्य रेल्वे माटुँगा वर्कशॉप अंतर्गत "दिवाळी...नविन नात्यांसोबत" हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न

मुंबई : शुक्रवार दि.०१/११/२०२४ रोजी 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' मध्य रेल्वे माटुँगा वर्कशॉप अंतर्गत यावर्षीही शहापूर- आटगांव येथील चिंचेचा पाडा,बिबीचा पाडा,खोस्ते आणि भावसे या चार आदीवाशी शाळांमध्ये १०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले व बिबीचा पाडा येथील वाडीमधील ८८ माता भगिनींना भाऊबीज म्हणून साड्या,ताट,ग्लास,दिवाळी फराळ,उटणे अशा भेटवस्तू देऊन ओवाळणी दिली. सदर उपक्रम हा 'दिवाळी...नविन नात्यांसोबत' या नावाने एक उत्सव म्हणून साजरा केला जातो.या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. एक 'सामाजिक बांधिलकी' या नात्याने हा उपक्रम राबविला जातो. माटुँगा वर्कशॉपमध्ये आगरी,कोळी,कुणबी आणि भंडारी हे चार जातीचे चार जिल्ह्यांमधून (ठाणे,मुंबई,पालघर व रायगड) कामगार ड्यूटीवर आहेत. हे सर्व कामगार स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांनी एकजूटीने एकत्रित राहावे याकरिता 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' या नावाने हा समूह सुरू करण्यात आला.हा समूह मागील चार वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहे.          वाढदिवस,सेवानिवृत्त शुभेच्छा,शिवकालीन शस्त्र प्रदर्शन,वृक्षारोपन,गणेश प्रिय बौध्दिक स्तुत्य उपक्रम,ईको-फ्रेंडली होळी,वर्धापन दिन,वार्षिक स्नेह संमेलने तसेच भूमिपुत्र कामगाराच्या संकटकाळी मदतीचा हात इत्यादी छोटे-मोठे कार्यक्रम करत असतात.त्यातील 'दिवाळी...नविन नात्यांसोबत' हा जिव्हाळ्याचा, आनंद देणारा, मानसिक समाधान मिळवून देणारा असा एक आगळा-वेगळा उपक्रम आहे.'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' समूहातील कर्मचारी या उपक्रमासाठी महिनाभर तयारीसाठी लागतात. आदीवाशी वाड्यांचा शोध घेणे, गरजू व होतकरू अशा शाळांची निवड करणे, शैक्षणिक साहित्य व भाऊबीज भेट देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवा जमव व पॕकींग करणे, जाण्याचे नियोजन करणे इत्यादी गोष्टींची पूर्वतयारी करून वेळेचे नियोजन करून कार्यक्रमाची अचूक आखणी केली जाते. परिणामी उपक्रम किंवा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होतो.
      वरील चार शाळा व बिबीचा पाडा यांबद्दल योग्य नियोजन करणारे संदीप भोईर सर, प्रसाद शिंदे सर,नाथा मेंगाळ सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.यासर्वांशी संपर्क करणारे 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' चे सदस्य संदीप वाघेरे होते. सुरुवातीला चिंचेचा पाडा येथील शाळेत ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप केले. तेथील विद्यार्थ्यांची शिस्त आणि विद्यार्थ्यांमधील संस्कारांचे दर्शन झाले. आदीवाशी असूनही स्वच्छता आणि शिस्तीचे पालन करणारे विद्यार्थी होते. फुलांचे गुच्छ,छोटे कंदील व विद्यार्थ्यांनी केलेले वर्गातील स्वागत हे त्याची साक्ष देत होते. त्यानंतर बिबीचा पाडा,खोस्ते व भावसे या तीन शाळेतील ६६ विद्यार्थी व बिबीचा पाड्यामधील माता-भगिनी यांचा बिबीचा पाडा येथे एकत्र कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातील उपस्थित सर्व विद्यार्थी,पाड्यातील माता-भगिनी आणि 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' हे सदस्य मिळून सर्वांनी कांदे पोहे व चाय हा अल्पोपहार घेतला. तद्नंतर 'दिवाळी...नविन नात्यांसोबत'हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सुत्रसंचनामध्ये संदीप भोईर सरांनी 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' समूहाचे शब्दसुमनांनी स्वागत केले. 'भूमिपूत्र प्रतिष्ठाण' समूहातील सदस्य आनंद म्हात्रे यांनी मनोगतात 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' समूहाची ओळख व करत असलेले कार्य सुंदर प्रकारे मांडले. नंतर नवनाथ ठाकुर यांनी 'दिवाळी...नविन नात्यांसोबत' या उपक्रमाचा मुख्य हेतू व 'गणेश प्रिय बौध्दिक स्तुत्य उपक्रमा'बद्दल थोडक्यात आपले विचार मांडले. समाजामध्ये देणारे भरपूर भेटतील.परंतु येथे देणारा वर्ग हा नातं बांधून काहीतरी देणार आहे.त्यामुळे येथे देणारा मोठा आणि घेणारा हलका हा प्रश्नच उरत नाही. 'दुसरा' हा 'दुसरा' नाही.' ही समज जेव्हा आपल्यात निर्माण होईल तेव्हाच देण्याची भावना बदलेल.त्यासाठी त्यांनी अकबर बादशहाचा बोधक दृष्टांतही सांगितला. त्यानंतर समोरील विद्यार्थ्यांना संबोधित करतांना 'शिक्षण आणि संस्कार' यांमधील भेद समजण्यासाठी माडीवर बसलेल्या एका शेडजीचा विनोदी दृष्टांत सांगून वातावरण प्रसन्न केले.अशाप्रकारे विद्यार्थी व माता-भगिनींना संबोधित केले.आम्ही कामगार आतापर्यंत आमच्या कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करायचो.परंतु 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' समूहाशी जेव्हापासून आम्ही जोडले गेलो तेव्हापासून आम्ही एक दिवस दिवाळी इतरांसोबत साजरी करू लागलो आणि यात आम्हाला आनंद आणि समाधान मिळू लागले.म्हणून हा उपक्रम आहे. भाऊबीज म्हणून साडी व भांडी,जीवन सुगंधी बनावे म्हणून उटणे, दिवाळीत नात्यांची परंपरा म्हणून फराळ एकंदरीत आमची ही बहिणींना ओवाळणीच आहे. अशाप्रकारे 'दिवाळी...नविन नात्यांसोबत' या उपक्रमाबद्दल नवनाथ ठाकुर यांनी अतिशय मार्मिक शब्दात समजावले. नंतर वरिष्ठ कामगारांच्या शुभहस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले. शेवटी उपस्थित सर्व सदस्यांनी वाडीतील माता-भगिंनीना भाऊबीज म्हणून भेटवस्तू देऊन ओवाळणी केली. तीन शाळांचे मुख्याध्यापक संदीप भोईर सर (बिबीचा पाडा),प्रसाद शिंदे सर (चिंचेचा पाडा),नाथा मेंगाळ सर (खोस्ते)आणि स्थानिक गावचे अध्यक्ष रमेश भुसारे यांचा 'भूमिपुत्र प्रतिष्ठाण' समूहाच्या वतीने शॉल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. संदीप भोईर सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषीत केले.
       दुपारी ०१:०० वा. तेथील एका उद्यानामध्ये भोजन करण्यात आले. व तेथूनच परतीच्या प्रवासाला लागले. अशाप्रकारे 'दिवाळी...नविन नात्यांसोबत' हा भावनिक उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सा. भगवे वादळ तृतीय वर्धापन दिन थाटामाटात संपन्न !!

मुंबई: नुकताच मुंबईत, मुंबई मराठी ग्रंथालय सूरेंद्र गावस्कर सभागृहात सकाळी सर्व उपस्थितांना चहा- नाश्ता देण्यात आले. तसेच पुरस्क...