आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

'डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा' यांच्या वतीने उरणमध्ये वृक्षारोपण

उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीकोणातून व पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या अनुषंगाने रविवार दि ६ ऑक्टोबर २४ रोजी 'डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा' यांच्या वतीने उरण तालुक्यातील करंजा गावातील नव्याने सुरु झालेल्या मच्छिमार गोदी येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मच्छिमार सोसायरी चेअरमन - प्रदीप नाखवा, नवापाडा गाव अध्यक्ष - मनोहर कोळी, दिलीप कोळी , नारायण नाखवा तसेच इतर सदस्य उपस्थित होते.यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: