आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालयात वाचनालय व निवारा केंद्राची सुविधा

मुंबई (उदय वाघवणकर) - सर्व पादचारी, वाहतूकदार, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक, वाहतुकीमध्ये लांबचा प्रवास करणारे मधुमेही व सामान्य प्रवासी, परिसरातील रहिवासी यांच्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालयाशेजारी सर्व सोयीसुविधांयुक्त स्वच्छतागृह, निवारा केंद्र बनवण्यात यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने, लोकसेवा वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या स्वच्छतागृहाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
      या केंद्रात दिवस रात्र निवारा, सोयीसुविधायुक्त स्वच्छतागृह, निवाऱ्यासाठी ३८ बेडची सुविधा, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच बाळासाहेब ठाकरे मनपा रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आमदार निधीतून वाचनालय उभारण्यात आले.त्याचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी पार पडला.यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर मेढेकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुखदेव, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा गांगण, वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मनाभ पटवारी, डॉ. मनिष पाटील, डॉ. देवेंद्र हिरे तसेच इतर कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...