कोल्हापुरात दि. १४ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूरचे खासदार यांच्या हस्ते होणार सन्मान !!
मुंबई ( प्रतिनिधी) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगती करिता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार उद्या दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सतेज पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विक्रोळी मुंबई येथील ज्येष्ठ समाजसेवक गुणवंत कामगार व कोल्हापूरचे सुपुत्र , विशेष कार्यकारी अधिकारी, व महाराष्ट्र शासन सहकार विभागाचे शासकीय ऑडिटर व निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र रत्न प्रभाकर तुकाराम कांबळे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून सामाजिक ,शैक्षणिक ,कला , साहित्य, सहकार ,कामगार व पत्रकारिता क्षेत्रात वयाच्या अठराव्या वर्षापासून काम करत असल्याने त्यांचा " राष्ट्रीय सहकार भूषण पुरस्कार " देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांना महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाचा सन २०१३ चा " गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार" व इतर सामाजिक संघटना व संस्थेकडून ३०० हून अधिक पुरस्कार वयाच्या पन्नाशीच्या आत मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव अजरामर करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा असून महाराष्ट्राच्या विकासात भर घालण्याचा सतत प्रयत्न करत आहेत.
पत्रकारिता व सहकारातून समाज विकास करत मनाची प्रचंड इच्छाशक्ती ,कष्ट करण्याची तयारी ,माणसं जोडण्याची कला यातून माणसं आपलीशी करत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अन्याय विरोधात लढत प्रगतिकडे वाटचाल करत आहेत.
सहकार क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्राच्या माध्यमातून समाज कार्य करत आहेत. अनेक सहकारी संस्थांना सहकार्य व मार्गदर्शन ही करत असतात. सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचे व जनजागृती करण्याचे काम सतत करत आहेत.
महात्मा फुले, शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीतून कृतिशील कार्याचा वाटा उचलून आई-वडील शिक्षक या सर्वांच्या विचाराने उभे राहुन अतिक्रष्टातून परिस्थितीशी सामना देत पदवी ,पदव्युत्तर व बी.एड तसेच जीडीसी व डीसीएम पर्यंत शिक्षण घेऊन गावापासून ते मुंबई पर्यंत नोकरीसाठी व सामाजिक कार्यासाठी भटकंती करत सर्वसामान्य जनता , विद्यार्थी पालक ,सहकारातील सभासद ठेवीदार अशा अनेक माणसांचे दुःख झेलून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून. ".मानव सेवा हीच ईश्वर सेवा" मानून महाराष्ट्राच्या जडणघडणीत उल्लेखनीय कार्य सतत करत आहेत..
घराघरात भारताचे संविधानाची माहिती पोहोचवण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरात वनिता फाउंडेशनच्या माध्यमातून संविधान गौरव परीक्षेचे आयोजन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे..
प्रभाकर तुकाराम कांबळे यांच्या जन्म पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून गोरगरीब व सर्वसामान्य तळागावातील जनतेपर्यंत प्रत्यक्ष कृतीच्या व वृत्तपत्र लेखनाच्या माध्यमातून महान कार्य केले असून त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार ,कामगार व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय असे एकूण ३०० हून अधिक पुरस्कार मिळविणारे कोल्हापूरचे सुपुत्र म्हणून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे वनिता फाउंडेशनचे अध्यक्ष वनिता कांबळे सुनील निकाळे ,राज जाधव, व मिलिंद सेवा सहकारी संस्थेचे राजेंद्र कांबळे व तुकाराम पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. वृत्तपत्र लेखनाच्या माध्यमातून समाज कार्य करणारे सुशिक्षित अभ्यासू कर्तव्यदक्ष चारित्र्यसंपन्न व कर्तव्यदक्ष, शासकीय व निम शासकीय कामाची व नियमाची परिपूर्ण माहिती असणारे जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून सुसंवाद साधणारे सेवाभावी तडफदार कार्यसम्राट म्हणून प्रभाकर कांबळे यांची ओळख असल्याने कोल्हापूर येथे त्यांना "राष्ट्रीय सहकार भूषण पुरस्कार "देऊन गौरव करण्यात येणार असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा