आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

गडब येथे "जलद गाड्या थांब्या"बाबत नामफलकाचे अनावरण

गडब(अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन्चार्ज अपर्णा वर्तक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते . सदर निवेदन प्रवासी "रजादिन" याचे अवचित्य साधून सदर निवेदन गडब गावातील पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला अध्यक्षा सौ. अवंतिका सुरेश म्हात्रे आणि रायगडची शानचे संपादक सुरेश म्हात्रे यांनी पेण विभाग नियंत्रक यांना देण्यात आले होते.
    सदर निवेदनात पेण तालुक्यातील गडब गावातील कामगार वर्ग व विद्यार्थी व इतर प्रवासी वर्ग यांना समस्या भेडसावत होती. त्यामुळे लोकांची गैरसोय लक्षात घेता हे निवेदन सौ . म्हात्रे यांनी दिले होते .यासंदर्भात पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व अपर्णा वर्तक यांच्याशी गेली दोन महिने अर्जाचा पाठपुरावा केला व वेळोवेळी स्वतः भेटून व दुरध्वनीवरून संपर्क साधला असता अखेर विभाग नियंत्रकांनी अर्जाची दखल घेत सदर समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जातील व प्रवास्यांचे समाधान होईल असे म्हात्रे यांच्याशी वेळोवेळी बोलताना सांगीतले . त्या अनुषंघाने गडब गावाठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्या संदर्भातील फलक पेण तालुका राषद्वादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ अवंतिका म्हात्रे आणि संपादक सुरेश म्हात्रे यांना फलक सुपुर्द करण्यात आले . आणि ते फलक आज गडब गावातील बस स्टॅन्डवर लावण्यात आले यावेळी राष्टवादी काँग्रेस पेण तालुका महिला उपाध्यक्ष सौ अवंतिका म्हात्रे, रायगडची शानचे संपादक श्री सुरेश म्हात्रे अनंत चवरकर, राजा कोठेकर , कल्पेश शिंदे , अनंत कडू , शौर्य म्हात्रे आदी उपस्थित होते.
   यावेळी गडब येथे गजानन गाड्या थांबण्यात याव्या असा सर्वांनी मनोदय व्यक्त केला . या स्तुत उपक्रमाबद्दल समस्त गडब वासियान तर्फे उभयंतांना धन्यवाद देण्यात आले !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...