सावर्डे (विश्वनाथ पंडित)- तुरंबव( चिपळूण) गावचे ज्येष्ठ समाजसेवक तुकाराम जीवनराव तथा दादासाहेब पंडित यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामविकासाच अखंड ध्यास त्यांनी जीवनाच्या अखेर पर्यंत जोपासला. गावच्या शारदा समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत असतांना त्यांनी पदापेक्षा कामाला प्रतिष्ठान देऊन भावी पिढीसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवून यशस्वी केले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे योगदान होते. लालबाग सारख्या गिरण गावातही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता. सामाजिक कार्याचे तगडी इच्छाशक्ती, अपाट उत्साह आणि आरपार प्रमाणिकपणा या व्यक्तिमत्व वैशिष्ट्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटत. संघटना कौशल्य, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, संयमी नेतृत्वगुण दादासाहेब पंडित यांच्यापाशी होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक कार्यातील नवोदित कार्यकर्त्यांची, अनेक सामाजिक संस्थांची फार मोठी आणि झालेली आहे. तुरंबव गाव एका आदरणीय, ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मुकला आहे. दादासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा