आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

पत्रकार सतिश पाटील यांचा वाढदिवस साजरा!!

मुंबई : मुलुंड येथील पत्रकार  सतिश पाटील यांचा वाढदिवस मा.श्री. उद्धव जी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलुंड ,नाहूर शाखा क्रमांक १०८ च्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते श्री.सतिश वि.पाटील हे (पत्रकार) व सामाजिक कार्यात नेहमीच प्रयत्नशील असतात. अनेक धार्मिक, सामाजिक व वैद्यकीय मदत कक्षात ही अग्रेसर असतात . आरोग्य शिबीर निशुल्क ही राबवून समाजप्रती आपण देणे लागतो याचाच एक भाग म्हणून त्याचे अविरत असे प्रयत्न चालूच असतात. अडचणीत रूग्ण सेवा व अँम्बुलेन्स सेवा कमीत कमी खर्चात देण्याचा प्रयत्न करतात.वेळप्रसंगी आर्थिक मदत ही करण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. या आधीही ऑटो रिक्षा व टेम्पोतून त्यांनी अनेकांना निशुल्क सेवा उपलब्ध करून दिली आहे.धार्मिक क्षेत्रात पालखी ,होळी,गणपती ,जयंती यांच्या मार्फत नेहमीच नाश्ता ,अल्पोपाहार, शीत पेय असा वसा आजही कायम परेश डेकोरेटर व सांऊड, लाईट लहान बंधू श्री. राजु पाटील व मुले कार्यरत आहेत.  या लोकप्रियतेनेच त्यांना शाखेकडून वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांची प्रतिमा , शाल व पुष्पगुच्छ देऊन व केक कापून सत्कार करण्यात आला .हे सर्व शिवसैनिकांचे व जनतेचे प्रेम ,विश्वास व आदर्श याचे उत्तम उदाहरण आहे .
    याप्रसंगी उपविभागप्रमुख श्री. दिनेश जाधव, शाखाप्रमुख  श्री. शैलेश धर्मराज पवार, मुलुंड ग्राहक संघटक - श्री. प्रकाश सावंत, कार्यालयाप्रमुख अविनाश दसबुड यांच्यासह सर्व शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.त्यांना वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळीने विडिओ मार्फत ही शुभेच्छा दिल्या आहेत . यामध्ये गायक श्री जगदीश भाई पाटील, श्री संतोष चौधरी (दादूस) , श्री किसन फुलोरे (काका), श्री चिंतामणी शिवडीकर (काकूस),श्री राजेश खर्डे ,श्री अनिल वैती तसेच कवी , लेखक :श्री नवनाथ ठाकूर,कवी ,लेखक श्री गिरीष म्हात्रे , श्री.संतोष म्हात्रे ,मा.नगरसेवीका रजनी केणी,एकविराआई मुलुंड पालखीचे अध्यक्ष: श्री.कैलास पाटील, नानेपाडा मित्र मंडळ अध्यक्ष: श्री. मधुकर म्हात्रे,श्री .जयदीप भोईर (बाॅक्सर, गनमॅन , अनेक पुरस्कारप्राप्त असे मिलटरी मॅन) यांनी व सर्व मित्रमंडळीने शुभेच्छांचा वर्षाव केला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...