गडब (अवंतिका म्हात्रे) तंबाखूजन्य पदार्थ शरीरास हानिकारक असतात .यामुळे वेळप्रसंगी 'कर्करोग' होऊन जीवाला विशेष मुकावे लागते. शासनाने २०१२ मध्ये गुटखा विक्रीवर बंदी घातली होती . मात्र ,परराज्यातून दाखल होणारा गुटखा किराणा दुकाने त्यांवर सर्रासपणे विकला जात आहे चरस गांजा देखील विक्री होत असतो .यामुळे कारवाईची जबाबदारी असणाऱ्या शासकीय यंत्रणेकडून याला मुक संमती असल्याचे चित्र आहे.
वडखळ आणि गोवा गेट परिसरात शाळा पोलीस ठाणे हॉस्पिटल जवळील टपऱ्याचे पदार्थ यांची खुल्या विक्री होत असते यामुळे वडखळ बाजारपेठेत व तालुक्यातील तरुण पिढी याच्या आहारी जाऊन बरबाद होत असते यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. इतर तालुक्यात लाखो रुपयांचा गुटखा विकला जात असताना पकडला जातो. मात्र गुटखा किंवा इतर नशेचे पदार्थ सुद्धा आता कधी पकडला जातील याची चर्चा जनतेत सुरू आहे .
वडखळ मधील टपरीधारक व गुटखा होलसेल हे मध्यरात्रीपर्यंत दुकाने उघडी ठेवून विक्री करीत असतात .दरम्यान एका गुटखा विक्रेत्याने वाशी नाका येथे भाड्याची खोली घेऊन तेथे तो सर्व गुटखा विक्री करीत असतो .यापूर्वी त्याच्यावर कारवाई झालेली आहे .
पान टपऱ्यांवरील पुड्यांचा खच
पान टपऱ्यांमध्ये गुटखा पुडीतील माललटकवून ठेवण्याचा प्रकार बंद झाला आहे. मात्र कुठेही गुरखा पुडी मागीतल्यास ती एमआरपी पेक्षा अधिक दर देऊन ग्राहकांच्याहाती दिली जाते.पान टपऱ्यांसमोर रिकाम्या गुटख्याचा खच पडलेला दिसून येतो यावर कोणतीही कारवाई होत नाही.
कारवाईची मागणी
पान टपऱ्यांपर्यंत विक्री केली जाते . वडखळ शहरातील ग्रामीण भागात विशेष करून गोवा गेट गडब येथे होत असते .हे जाणून संबंधित विभागाने व पोलीस यंत्रणेने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा