आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

बालेवाडी पुणे येथे झालेल्या शॉटगण नेमबाजी स्पर्धेत अवनी कोळी हिने केले रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

गडब (अवंतिका म्हात्रे) दिनांक 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2024 दरम्यान बालेवाडी पुणे झालेल्या 39 व्या महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशन आयोजित ट्रॅप व डबल ट्रॅप शॉटगन नेमबाजी स्पर्धेत कुमारी अवनी अलंकार कोळी हिने रायगड ज़िल्ह्याचे प्रतिनिधीत्व सिद्धांत रायफक व पिस्टल शूटिंग क्लब पनवेल तर्फे सहभाग घेऊन जुनिअर व सिनियर डबल ट्रॅप मध्ये वयक्तिक सिल्वर मेडल वल्ड चॅम्पियन हिना सिद्धु व कॉमनवेल्थ गोल्ड मॅडलिस्ट रोनक पंडित यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तिने ह्या स्पर्धेत सर्वाना आश्चर्याचा धक्का देत रायगड करांची मान सन्मानाने उंचावल्याबद्दल तसेच तिचे प्रशिक्षक श्री रालस्टन आंतरराष्ट्रीय ज्युरी, किसन खारके राष्ट्रीय नेमबाज ( रायगड भूषण )व अलंकार कोळी यांच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले, तसेच ती शिकत असलेल्या इंडियन मॉडेल स्कूल अँड जुनिअर कॉलेज उलवे च्या प्राचार्य सौं. गौरी शाह व कॉलेज चे संचालक यांनी तिचे या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...