मुंबई: सार्वजनिक पूजा समिती, भांडुपगाव तर्फे अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ' व्यसनमुक्ती शिबीर ' नुकतेच (रविवार दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी) कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. रोहन बारटके यांनी लोकांना मार्गदर्शन केले. डॉ. रोहन यांनी अशी माहिती दिली की तंबाखूचे सेवन करणारे जवळपास ४८ टक्के लोक आहेत. त्यामुळे लोकांत कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट येत आहेत. डॉ. रोहन बारटके यांचे स्वागत सरचिटणीस महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यांनी केले. उपाध्यक्ष धनंजय म्हात्रे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश शेलार उषा काकडे, सोनल कोपरकर, मयूर म्हात्रे, डॉ. देविदास किणी, रजनी पाटील आदी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा