आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

नायर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांच्या हस्ते प्रदीप दादा साळवे सन्मानित

मुंबई दि. २ (रामदास धो. गमरे) आंबेडकर कुटुंबाचे शिलेदार, आंबेडकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते, श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर, मा. भिमराव आंबेडकर व सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे आत्येभाऊ, बहुजन सेवा संघाचे माजी अध्यक्ष, रिपब्लिकन सेना दक्षिण मुंबईचे कोषाध्यक्ष, नायर हॉस्पिटलचे प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ कर्मचारी आदरणीय प्रदीप दादा साळवे यांचा ५८ वा वाढदिवस व सेवानिवृत्तीचा कार्यक्रम रिपब्लिकन सेना दक्षिण मुंबई व नायर रुग्णालय कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नायर रुग्णालयाचे डीन मा. डॉ सुधीर मेढेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
   सदर प्रसंगी नायर रुग्णालयातील कर्मचारी, युनियन कार्यकर्ते, रिपब्लिकन सेना दक्षिण मुंबई अध्यक्ष भगवान साळवी, उपाध्यक्ष भाई जोशी, सचिव महेंद्र पवार, प्रसिद्धी प्रमुख मंगेश जाधव, मोहन जाधव, दर्शन जाधव, संघटक किशोर साळवी, कार्यकारणी मंडळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नायर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांच्या शुभहस्ते प्रदीप दादांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

आंबडेकरी कुटुंबाशी जवळचे नाते असणारे प्रदीप दादा म्हणजे नायर रुग्णालयात येणाऱ्या अनेक गोरगरिब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निस्वार्थी मदतीचा हात होता, त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ते मोलाचे सहकार्य करीत सोबतच रुग्णालयातील बहुजन सेवा संघ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम बघताना ही त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी कामगारांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना न्याय मिळवून दिला, कट्टर आंबेडकरवादी व बौद्ध असल्याचा अभिमान केवळ बाळगण्यासाठी नसून किंवा फक्त जय भीम म्हणण्यापूरता मर्यादित नसून तो एक जाज्वल्य अभिमान आहे हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले त्याचेच जिवंत उदाहरण म्हणजे नायर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या हॉलमध्ये असलेली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जी प्रदीप दादांच्या अथक परिश्रमातुन आज नायर रुग्णालयात स्थापन झालेली आहे अशी अगणित कामे प्रदीप दादांनी निस्वार्थीपणे व कोणत्याही प्रसिद्धीची हाव न धरता केली आहेत. कालकथित भाई संगारे व अखिल भारतीय सेनेचे संस्थापक सदस्य अरुण गवळी (डॅडी) यांच्याशी प्रदीप दादांचे जवळचे संबंध होते त्यामुळे राजकीय क्षेत्रात ही दादांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती परंतु मा. भाई संगारेंच्या अकस्मात मृत्यूनंतर प्रदीप दादा राजकारणापासून लांब झाले; अश्यातच भाई संगारेंच्याच स्मृतिदिनी रिपब्लिकन सेनेच्या भगवान साळवी यांची ओळख दादांसोबत झाली व असे धडाडीच्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे हे ओळखून त्यांना रिपब्लिकन सेनेत घेण्याची ईच्छा त्यांनी रिपब्लिकन सेना संस्थापक आनंदराज आंबेडकर यांना बोलून दाखवली तेव्हा आनंदराज म्हणाले की दादा सरळमार्गी, प्रामाणिक व आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ व्यक्ती आहे अश्या व्यक्तींची गरज पक्षाला आहे जर ते येत असतील छानच आहे, त्यानंतर प्रदीप दादांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करीत दक्षिण मुंबईचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहू लागले त्यानंतर आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले इंदू मिल आंदोलन व अनेक इतर आंदोलनात प्रदीप दादांनी हिरिरीने सहभाग घेतला त्यांचा वाढदिवस व सेवानिवृत्ती असे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी असल्याने वाढदिवसाच्या आनंदासोबतच दादांच्या सेवानिवृत्तीचे दुःख अश्या सुख-दुःख्याच्या संमिश्र भावना उपस्थितांच्या मुखावर स्पष्ट दिसत होत्या.
   सरतेशेवटी रिपब्लिकन सेनेचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष भगवान साळवी यांनी उपस्थितीतांचे आभार मानून प्रदीप दादा साळवे जरी नायर रुग्णालयातून सेवानिवृत्त होत असले तरी सामाजिक, राजकीय कार्यातून ते कधीच सेवानिवृत्त होणार नाही सेवानिवृत्ती नंतर ते सामाजिक, राजकीय अश्या सर्वच क्षेत्रात दुप्पट उत्साहाने काम करतील अशी ग्वाही देत कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण

मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...