आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेतून धारावीच्या "रेणुका सोनवणे स्वच्छतादूत

मुंबई ः मुंबई महापालिकेकडून राबवल्या जात असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापित सोनिया महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका सोनवणे, सदिच्छा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सीमा पाताडे यांची स्वच्छतादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे बुधवारी (ता. २) पार पडलेल्या ‘स्वच्छ भारत दिवस, स्वच्छ भारत अभियान’ कार्यक्रमात या दोघींनी सहभाग नोंदविला. या निवडीबद्दल महापालिका प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवले जात आहे. याच अभियानांतर्गत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभियानाचा दहावा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशातील ३२ राज्यांतून महिला स्वच्छ्तादूतांची निवड करण्यात आली. सोनिया आणि सदिच्छा हे महिला बचत गट ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’अंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व वस्ती स्वच्छ्तेची कामे करीत आहेत.
     सौ.रेणुका सुरेश सोनवणे या सातारा जिल्ह्यातील म्हसवड,तालुका माण येथील सौ शंकूतला आण्णा खाडे (पुजारी) यांची मुलगी असली तरी सण १९९७ साली लग्नानंतर त्या धारावीतील पारशी चाळ येथे वास्तव्यास आल्या. त्यानंतर पती सुरेश सोनवणे यांचा पारंपरिक व्यवसायास चामडेपासून पाकीट बनवणे हा व्यवसाय करताना यांच्यासोबत आपल्या कुटूंबाची जबाबदारी सांभाळत धारावीच्या कार्यसम्राट आमदार वर्षाताई गायकवाड यांच्या आशीर्वादाने समाजसेवेची आवड निर्माण झाली.सामाजिक कार्य करत करत स्वच्छता मोहीम राबवण्यास प्रोत्साहन मिळाले ते आजही सुरू आहे. छोटी छोटी कामे करण्यास सुरुवात केली.त्यांची मिळेल ते काम करण्याची जिद्द त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी बचत गट स्थापन करून ग/उत्तर महापालिका विभागामध्ये घाण कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दत्तक योजनेतुन कामे घेत धारावीतील झोपडपट्टी भागात काम करून स्वच्छतेचा विडा उचलून स्वच्छ मुंबई अभियानातून स्वच्छ माझी धारावी या संकल्पनेतून त्यांनी कामाला प्राधान्य दिले,त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महापालिकेच्या वतीने दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम २ ऑक्टोबर २०२४ राबवण्यात आली,यावेळी रेणुका सोनवणे व सीमा पाताडे यांच्या महिला बचत गटाची निवड करून त्यांची 'स्वच्छतादूत' म्हणून महानगरपालिकाने नियुक्ती केली होती,त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली, याबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

[[ मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित सोनिया महिला बचत गटाच्या (जी उत्तर विभाग) अध्यक्षा रेणुका सोनवणे, सदिच्छा महिला बचत गटाच्या (पी उत्तर विभाग) अध्यक्षा श्रीमती सीमा पाताडे यांची या कार्यक्रमात स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आली. सोनिया आणि सदिच्छा हे दोन्ही महिला बचत गट 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान' अंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व वस्ती स्वच्छतेची कामे करतात.त्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे मनपा अधिकारी यांनी सांगितले.]]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: