उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला न्यु ट्रान्सइंडिया प्रा. लि., खोपटे येथील सर्व्हेअर कामगारांच्या पगारवाढीचा करार कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या यशस्वी मध्यस्थिने करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ८१०० रुपये पगारवाढ, एक ग्रॉस सॅलरी बोनस म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच ३ लाख रुपयांची कामगारांच्या परीवारासाठी मेडिक्लेम पॉलीसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.या करारनाम्याप्रसंगी न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत,कार्याध्यक्ष पि. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष विनोद म्हात्रे, व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर अजिंक्य हातीस्कर,कामगार प्रतिनिधी अलंकार पाटील, मनिष म्हात्रे, राजाराम पाटील, उत्कर्ष ठाकूर, राजेश पाटील, नरेंद्र पाटील, विकास म्हात्रे, सुरज म्हात्रे, मयूर घरत, प्रथमेश म्हात्रे, राकेश पाटील, अक्षय ठाकूर, भूषण पाटील, ज्ञानदेव पाटील, सुजित म्हात्रे, रितेश ठाकूर आदी उपस्थित होते.या पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगारांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण
मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा