मुंबई दि. २७ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने मार्च-एप्रिल २०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत (SSC & HSC) परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि विविध विद्याशाखेत पदवीधर व पदविकाधारक झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास भिमराव की बेटी हूं फेम प्रबोधनकार गायिका दिक्षा राजेश शिर्के या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे हे उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींना मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालनाची धुरा सरचिटणीस राजेश घाडगे सांभाळणार असून शिक्षण समिती अध्यक्ष राजेश पवार प्रस्ताविक सादर करतील तर शिक्षण समिती, चिटणीस अशोक मोहिते आभार प्रदर्शन करतील तसेच उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे, अंकुश सकपाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक, शाखा पदाधिकारी, व्यवस्थापक मंडळ, बौद्धाचार्य व सभासद यांनी उपस्थित रहावे अशी विनंती जनसंपर्क व प्रसिद्धी समिती अध्यक्ष रमेश जाधव व चिटणीस विश्वास मोहिते यांनी समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा