मुंबई (उत्कर्ष गुडेकर)ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या कृष्णा मारुती कदम याना यंदाचा २०२४ वर्षाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.पाक्षिक आदर्श रायगड यांच्या वतीने आयोजित पुरस्कार समारंभात कदम यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजक रमेश सणस,अविनाश म्हात्रे,शैलेश सणस यांनी सांगितले.पक्षिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सांय ५ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय,रोटरी हॉल समोर,वीर बाजीप्रभू देशपांडे,वडवली विभाग,अंबरनाथ पूर्व येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.या पुरस्कार साठी संस्थेने सामाजिक ,शैक्षणिक,पत्रकारिता,साहित्य,वैद्यकीय,क्रीडा आदींचा समावेश केला आहे.वैद्यकीय क्षेत्रातून कृष्णा कदम यांना समाजभूषण जाहीर करण्यात आला आहे.गेली तीन वर्ष कृष्णा कदम हे ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत.तसेच अंध , दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.कृष्णा कदम याना या सेवकार्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप
मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा