आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

मराठी वृत्तपत्रसंघ मुंबई यांच्या ७५ व्या वर्धापन दिन अन् अमृतमहोत्सवी सोहळ्यात वृत्तपत्र लेखक, पत्रकार श्री दिनेश तुरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार !!

मुंबई: महाराष्ट्रातील पत्रकारांची अग्रगण्य संघटना मराठी वृत्तपत्रसंघ मुंबई यांचा ७५ वा वर्धापन दिन अमृतमहोत्सवी सोहळा. या सोहळ्यानिमित्त मराठी वृत्तपत्र संघ- दैनिक नवशक्ती व फ्री प्रेस यांच्या वतीने अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई महानगरपालिका आयुक्त सन्माननीय  भूषण गगराणी  तसेच ज्येष्ठ लेखक पत्रकार-समीक्षक विनय हर्डीकर  तसेच दैनिक नवशक्तीचे कार्यकारी संपादक  प्रकाश सावंत, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष  रवींद्र मालसुरे,  माजी अध्यक्ष  विजय कदम,संघाचे सर्व पदाधिकारी,  वृत्तपत्र लेखक , इलेक्ट्रिक व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम फ्री प्रेस हाऊस नरिमनपॉईंट-दैनिक नवशक्तीच्याऑफिस मध्ये मोठ्या आनंदात संपन्न झाला.
    सदर कार्यक्रमात समाज उभारणीचे दीपस्तंभ व एक सेवाभावी जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या उत्कर्षासाठी पत्रलेखन व समाज विधायक करीत असलेल्या ध्येयवादी व प्रेरणादायी कार्याबद्दल वृत्तपत्र लेखक, पत्रकार आणि आदर्श वार्ताहर या पाक्षिक वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी श्री दिनेश तुरे यांचा सन्मान 
करून या सेवाभावी कार्याबद्दल मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करून गौरवण्यात आले. या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार मला होता आले याचा मला नितांत आनंद आहे असे मत तुरे यांनी व्यक्त करून मराठी वृत्तपत्र लेखक संघ,दैनिक नवशक्ती व फ्री प्रेस यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान

वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...