याप्रसंगी स्व.आर.आर.पाटील उद्यानाचे नूतनीकरण, रायन स्कुल ते निलसिध्दी सोसा. पर्यंतच्या जागेत लाॅन व शोभिवंत झाडे, झुडपे लावुन उद्यान निर्मिती. नवदुर्गा सोसायटी ते सफल सोसायटी पर्यंत ट्री बेल्ट खालील जागेचे सुशोभीकरण या कामांचा शुभारंभ लोकनेते आमदार गणेशजी नाईक, मा.खासदार संजीव नाईक, मा. आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी जीएसटी आयुक्त पी. के. सिन्हा, महाराष्ट्र राज्य पणन आयुक्त श्रीधर डुबेपाटील, मंत्रालय अंडर सचिव रमेश साळवे, पनवेल मनपा उपायुक्त बाबासाहेब राजळे, महानगर बॅंकेच्या श्रीमती गितांजली शेळके, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, जेष्ठ नगरसेवक डाॅ. जयाजी नाथ, मा. नगरसेवक संपत शेवाळे, मा. नगरसेवक दशरथ भगत, मा. नगरसेवक शशीकांत राऊत, मा. नगरसेवक सुरज पाटील, मा. नगरसेवक अमित मेंडकर, मा. नगरसेवक गणेश म्हात्रे, मा. नगरसेवक गिरीश म्हात्रे, मा. नगरसेवक प्रकाश मोरे, मा. नगरसेवक विजय वाळुंज, मा. नगरसेवक अशोक गुरखे, मा. नगरसेवक विनोद म्हात्रे, मा. नगरसेवक सुनिल पाटील, मा. नगरसेवक सुरेश शेट्टी, मा. सभापती प्रदीप गवस, मा.नगरसेवक विशाल डोळस, मा. नगरसेवक पुरूषोत्तम भोईर, मा. सभापती नेत्रा शिर्के, मा नगरसेविका शुभांगी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा भाजपा माधुरी सुतार, मा. नगरसेविका शिल्पा कांबळी, मा. नगरसेविका सरस्वती पाटील, मा. नगरसेविका श्रध्दा गवस, मा. नगरसेविका मिरा पाटील, मा. नगरसेविका सुरेखा इथापे, युवा मोर्चा महामंत्री रणजित नाईक, नेरुळ भाजपा अध्यक्ष कुणाल महाडीक, यशोमंदीर पतसंस्थेचे चेअरमन संकेत हुलवळे, नवी मुंबई बँकेचे चेअरमन श्री धुमाळ, भिमाशंकर पतसंस्थेचे चेअरमन गोपाळराव दाभाडे, ब्राम्हणवाडा पतसंस्थेचे चेअरमन अशोक गायकर, प्रभात पतसंस्थेचे चेअरमन राजीव काळे, नेरूळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर व पदाधिकारी, यूथ कौन्सिल नेरुळचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख आणि पदाधिकारी, विजय साळे, उद्योजक दिनेशभाई पासोरिया, उद्योजक उल्हासशेठ भोर, प्रोफेशनल कुरियर्सचे मालक अब्राहमभाई, विजय साळे, संजय भोसले, आप्पा इंदोरे, अंकुश हाडवळे, निनाद कदम व विभागातील सर्व सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी रवींद्र इथापे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा सविस्तर आढावा घेऊन सांगितले की, रवींद्र इथापे यांनी समाजहिताच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. सतत सकारात्मक वृत्तीने, खेळी मेळीच्या वातावरणात काम करत, द्वेषाने द्वेष वाढतो तर प्रेमाने प्रेम वाढते ही भावना स्वतःत सतत जागृत ठेवून, धर्माच्या जातीच्या पलीकडे जाऊन ते काम करत आले आहेत. म्हणूनच एवढा मोठा समाज आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी उपस्थित झालेला आहे. ही त्यांच्या कार्याची पावती आहे.
रवींद्र हांडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खूप कुशलतेने आणि छान केले. सौ सुरेखा इथापे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा