अलिबाग (दिनेश तुरे यांजकडून)कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे , मुक्काम वावे, तालुका -अलिबाग , जिल्हा -रायगड येथील आगरी समाजाच्या ,मनमिळावू स्वभावाच्या व परोपकारी वृत्ती व प्रेमळ - मायाळू स्वभाव असलेल्या, वावे गाव - सासर व बेलोशी गाव - माहेर असलेल्या सर्वांच्या लाडक्या कै. सौ. कल्पना देवदास राऊत यांची कामोठे -पनवेल येथील एम. जी एम हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक २७-०७-२०२४ रोजी अल्पशा आजाराने प्राणज्योत मावळली आहे . त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राऊत परिवार , वावे गाव, बेलोशी गाव , आप्तेष्ट व नातेवाईक शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या अकस्मात निधनाने विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वावे नाका येथे वडापाव व्यवसाय करून दोघे नवरा -बायको आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, अशा समयी सर्वांच्या हृदयात त्यांनी आपुलकीचे व आदराचे स्थान निर्माण केले होते. आपले पती देवदास यांना त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मोलाची साथ दिली होती .त्यांचा उभयतांचा संसार बहरत असताना नियतीने त्यांना अचानक हिरावून घेऊन त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात दिला आहे. त्यांची दोन्ही मुले आर्या व श्लोक ही आईच्या प्रेमाला व मायेला आज पोरखी झाली आहेत. त्यांच्या डोक्यावरचे आईचे छत्र आज हरपले आहे याचे अतीव दुःख आहे. त्याच्या पश्चात पती -देवदास , सासू - सासरे , राऊत परिवार ,आप्तेष्ट व नातेवाईक असा विशाल परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबाचा मायेचा व ममतेचा लुकलुकता तारा निखळला आहे. वावे गावच्या सामाजिक कार्यात व उत्सवात त्या नेहमी हसतमुख राहून आपल्या ग्रुप मैत्रिणींसोबत त्या नेहमी इतरांना हसवण्याची भूमिका पार पाडून योगदान देत असत. त्यांनी दिलेले योगदान ग्रामस्थांसाठी आदर्शवत असेच आहे. सर्वांच्या सुख-दुःखात त्या नेहमी धाऊन जायच्या हाच त्यांचा आदर्शवत स्वभाव होता. त्यांच्या अंतयात्रेत वावे येथील स्मशानभूमीत आपल्या भगिनीला, मुलीला , मामीला , काकीला , अखेरचा निरोप देण्यास सामाजिक - राजकीय व धार्मिक क्षेत्रातील विशाल जनसमुदाय उपस्तिथ होता हीच त्यांच्या सामाजिक कार्याची पोहचपावती होय. त्यांचे बारावी विधी मंगळवार दिनांक ०६ -०८ -२०२४ रोजी त्यांच्या वावे येथील राहत्या निवासस्थानी सकाळी १०.०० होणार आहे असे राऊत परिवारातर्फे कळविण्यात आले आहे. वहिनी - आपले कार्य - कर्तृत्व सदैव स्मरणात राहणार. आपली मायेच्या आठवण सदैव स्मरणात राहील. आपण कुटुंबासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही . वहिनी आपणांस भावपूर्ण श्रद्धांजली ! आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आपल्या मृतत्म्यास चिरशांती मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन
मुंबई (शांताराम गुडेकर ) साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा