वसई: गोवा म्हापसा येथील पेंडम स्टेडियम मध्ये "राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा २०२४" दिनांक २४ जुलै ते २८ जुलै २०२४ रोजी पार पडली. सदर स्पर्धेमध्ये भारताच्या ३० राज्यातून सुमारे ९३९ खेळाडूंनी १८८९ क्रीडा प्रकारात आपला सहभाग नोंदवला होता.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत (३३ सुवर्ण) प्रथम क्रमांक तर तामिळनाडू (२३ सुवर्ण) व पंजाब (१८ सुवर्ण) अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.नेहमीच प्रकाशझोतात असणारी वसई विरारची सुवर्णकन्या भार्गवी संखे हिने महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांक मिळविण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला.
भार्गवी संखे हिने सिनियर कॅटेगरी खेळताना पॉइंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, म्युझिकल हार्ड स्टाईल तसेच टीम पॉइंट फाईट मध्ये एकंदर ४ सुवर्णपदक पटकाविले.
आशियाई सुवर्ण पदक विजेती भार्गवी संखे हीची पुन्हा एकदा कंबोडिया येथे दिनांक ६ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियन्सशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यासाठी वेस्ट बंगाल इथे वॉको इंडिया आयोजित सराव शिबिरात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मार्गदर्शनाखाली सराव करण्याची संधी भार्गवी हिस मिळाली आहे.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा