आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

७८ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मुलुंड मध्ये उत्स्फूर्तपणे साजरा ! सन्मान कलेचा सन्मान मुलुंडच्या कलाकाराचा !!

मुंबई ( सतिश पाटील): श्री.राजेश चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विधानसभा विभाग अध्यक्ष एकनिष्ठ प्रतिष्ठान आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रतिवर्षी नवनवीन कल्पना व विषय मांडण्यात अनेक वर्ष अग्रेसर आहेत. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील सन्मान प्राप्त झालेले मान्यवर खेळाडू व कलाकारांचा सन्मान करण्यात येतो.यंदा देखील एका खास कलाकाराला आमंत्रित करण्यात आले होते. उल्हास नांद्रे ज्या कला क्षेत्रात पोर्ट्रेट आर्ट द्वारे अनेक पारितोषिक पटकावले राज्य पातळीवरील, देश पातळीवर इतकच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांच्या पारितोषिकांची यादी वाचली तर वेळ पुरणार नाही. 
    असे दिग्गज असे कलाकार मुलुंडकर म्हणून लाभले यांचा सर्वानाच सार्थ अभिमान असणार आहे. त्यांनी मुलुंड विद्यामंदिर या शाळेत शिक्षण घेतले आणि ती हस्ती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मा.श्री.अजिक्य नाईक यांनी  या कार्यक्रमात सहभाग घेऊन स्वातंत्र्य दिनानिमित त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर अमरज्योत प्रज्वलन मा.पोलीस निरीक्षक श्री .संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले . तर या कार्यक्रमात मनसेचे मा.श्री.शिरीष सावंत यांनी अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तसेच विश्व विजयी संघास सात थराचा मनोरा रचून गवणीचा गोविंदा पथकाने अतिशय कौशल्यपुर्वक सलामी दिली.तर बाल गोपाळ गोविंदा पथकाने देखील चार थर लावून सलामी दिली. तसेच एक आकर्षण एन सी एफ जवान कॅम्प यांनी देखील सैनिक पोशाखात सलामी दिली .यंदा प्रतिष्ठान च्या मार्फत प्रत्येक वर्षी नवीन कलाकृती सादर करण्यात येते. गेल्या वर्षी चंद्रयान-२ चा देखावा होता .यंदा वर्ल्ड कपचे खास आकर्षण होते . हा कार्यक्रम  मेहूल सर्कल मुलुंड( प.) येथे राबविण्यात येतो. यासाठी सहकार्य भोर बंधू व रोषणाई परेश डेकोरेटर यांची असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार,काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर)सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.)सानपाडा,नव...