आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

पेण च्या प्रायव्हेट हायस्कूल मैदानात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; कै.पु.न.गोडसे विद्या मंदिर वरसई शाळेतील मुलींची बाजी ! खो - खो सामन्यात पटकावले विजेतेपद !!

पेण ( प्रतिनिधी) दिनांक 24 ऑगस्ट रोजी प्रायव्हेट हायस्कूल पेणच्या मैदानात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्यात कै.पु.न.गोडसे विद्या मंदिर वरसई शाळेतील १७ वर्षे वयोगटातील मुलींनी खो-खो सामना खेळताना सेमी फायनल मध्ये सौ .म .ना. नेने कन्या विद्यालयाचा ४/७ असा पराभव करत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. तसेच अंतिम सामन्यामध्ये या शाळेतील मुलींनी एस .एम .पाटील माध्यमिक विद्यालय वरवणे विद्यालयातील मुलींचा जवळपास ४/६ असा पराभव करत ४ मिनिटे वेळ राखत अंतिम सामन्यात विजेतेपद प्राप्त केले. 
    या स्पर्धेसाठी श्री. आर.एम. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .तसेच वरसई पंचक्रोशीतील कै.पु.न.गोडसे विद्यामंदिर, वरसई शाळेचे माजी विद्यार्थी कुमारी राणी कदम ,रोहन सोनगरे, नितीन मोरे, निलेश पाटील ,प्रफुल्ल शिकवण ,समीर व सुशील काईनकर यांनी देखील योग्य मार्गदर्शन केले. तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री काळे सर यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नामदेव ठाकूर यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घे...