आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

बदलापुर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांनी घेतली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांची भेट

गडब (अवंतिका म्हात्रे) बदलापूर मध्ये एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि अख्खा महाराष्ट्र हादरला एकीकडे कोलकातामध्ये झालेल्या घटनेने देशात पडसाद उमटले असतानाच बदलापूरच्या घटनेने ही सर्वांना हादरवलं राज्य सरकारने या घटनेची दखल घेत एसआयटी स्थापन केली. त्याशिवाय आरोपीवर फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवणार असल्यासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.मागील सात तासांपासून बदलापूर मध्ये लोकांचा आंदोलन सुरू आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या. अशी संतप्त मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. नराधमाने अगदी कोवळ्या जीवाला त्या वयातच दोन चिमुकल्या ना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे बदलापूरकर रस्त्यावर उतरला. रेल्वे लोकल बंद झाल्या.संपूर्ण बदलापूर मध्ये बंद पाळण्यात आला. बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरले.
   याच प्रकरणाच्या निषेधार्थ आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी रावहवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदधिकारी यांनी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांची भेट घेतली व रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून महिलांच्या व मुलीच्या सुरक्षेसाठी अम्मल बजावणी करण्याचे आवाहन राइवादी काँग्रेस पक्षाच्या
विधानसभा अध्यक्ष वसुधाताई पाटील , तालुका अध्यक्ष चैताली पाटील, शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे, सुनीता घरत जयश्री पाटील, जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील, शहर युवती अध्यक्ष मुस्कान झटाम, स्वाती म्हामणकर या सर्वानी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल u
यांच्याकडे रक्षाबंधनाची ओवाळणी समजुन आमच्या विभागातल्या महिला सुरक्षीत राहील्या पाहिजेत व महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा असे निवेदन मांडून त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळवी असे सांगीतले .
   उरण व नवी मुंबईतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलीं वरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दामिनी पथकाची पुर्नरस्थापना करून पेणच्या भगिनींना संरक्षणाची कवचकुंडले दिली असल्याचे त्यांनी पदाधिकारी यांना सांगितले.
    या अंतर्गत पेण पोलीस ठाण्याचे कार्यरत असलेल्या चार महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये सौ. शिंदे, सौ. पालवे, सौ. धनावडे, व सौ. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पेट्रोलिंगकरीता अद्यावत नविन मोटार सायकल व एमडीटी (११२) सेवा पुरविण्यात आली आहे. डायल ११२ ही सेवा तात्काळ मदत पुरविण्यासाठी कटिबध्द आहेत असे त्यांनी सांगीतले आणि शाळा कॉलेज बाजारपेठ स्टॅन्ड व वर्दळीच्या सर्व ठिकाणी दामीनी पथके फिरत असल्याचे सांगितले .आम्ही सर्वोतपरी महीला सुरक्षेची अमंल बजावणी करीत असल्याचे पेण पोलीस निरीक्षक यानी पदाधिकाऱ्यांना सांगितले व आम्ही शाळा महाविद्यालय या ठिकाणी महिला सुरक्षा जनजागृती व्याख्यान करीत असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...