गडब (अवंतिका म्हात्रे) सध्या एसटीमध्ये " महिला सन्मान योजना " अंतर्गत लाखो महिला दररोज एसटीतून 50% तिकीट दरात प्रवास करीत आहेत परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा " सन्मान' देखील केला पाहिजे या हेतूने अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एसटीने जागा दाखवा हा प्रबोधनात्मक संदेश सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा व त्यातून जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे बऱ्याचदा गर्दीचा गैरफायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे लोकलचा प्रवास एसटीचा प्रवास अशा ठिकाणी महिलांची छेडछाड केली जाते त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते या विरोधात आवाज उठवण अत्यंत आवश्यक आहे किंबहुना महिलांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे धाडस दाखवलं पाहिजे त्याबरोबरच अशा महिलांना सहकारी प्रवाशांनी देखील सहकार्य केलं पाहिजे असा संदेश देणाऱ्या चित्रफिती आजपासून प्रत्येक बसस्थानकावर दाखवल्या जाणार आहेत प्रत्येक बसस्थानकावर समाज माध्यमाच्या द्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफिती द्वारे महिलांचा प्रवासादरम्यान सन्मान करावा असा प्रभोधनात्मक संदेश दिला जाणार आहे अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एसटीने जागा दाखवा हा प्रबोधनात्मक संदेश सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा व त्यातून जनजागृती करण्याचा उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण
मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा