मुलुंड(सतिश पाटील) बुधवार दिनांक २१ऑगस्ट२०२४ रोजी बदलापूर येथील शाळेतील बालकेवर शाळेतीलच सफाई कर्मचारी नराधम शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ .श्री. उद्धव बाळा साहेब शिवसेना यांच्या मार्फत शाखा क्रमांक १०४ ते शिवसेना शाखा १०६ असा मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. हि रॅली मुलुंड पश्चिम एम.जी.रोड ते मुलुंड पूर्व येथे समाप्त झाली.रॅली मध्ये आजीमाजी शिवसैनिक ,पदाधिकारी, महिला ,पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.या रॅलीचे नेतृत्व सिताराम खांडेकर, दिनेश जाधव, नितीन चवरे,व्यंकटेश अय्यर या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. यावेळी संतप्त मुलुंडकर ही सहभागी होऊन विकृत कृत्याचा निषेध करण्यासाठी उपस्थित होते.सरकारने अशा मनोवृत्तीच्या आरोपीला लवकरात लवकर योग्य व कठोर अशी शिक्षा फास्ट ट्रॅक वर झाली पाहिजे अशी मागणी या प्रसंगी केली गेली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण
मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा