आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

जागे अभावी तहसिल कार्यालय पेण येथे संपन्न होणारा ध्वजारोहनाचाकार्यक्रम उपविभागीय अधिकारी पेण येथे होणार संपन्न !! तहसिलदार - तानाजी शेजाळ

गडब ( अवंतिका म्हात्रे)पेण तालुक्यातील सर्व नागरिक, विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी/ कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी तसेच पत्रकार बंधू यांना आवाहन करण्यात येत आहे, की यावर्षीचा भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन समारंभ 15 ऑगस्ट 2024 हा तहसील कार्यालय पेण या ऐवजी मा. उपविभागीय अधिकारी पेण यांचे प्रांगणात संपन्न होणार आहे. तहसील कार्यालयात जागेचा अभाव तसेच वाहतुकीची होणारी कोंडी व पूर्वतयारीबाबत अडचणी निर्माण होत असतात. तसेच पेण तालुक्यात मा.उपविभागीय कार्यालयाची स्थापना झाल्याने तालुक्याचे मुख्य कार्यालय हे तेच आहे. तसेच तेथे जागेची अडचण उद्भवणार नाही व वाहतूक व्यवस्था देखील सुरळीतपणे व नियोजनबद्ध येईल .त्या दृष्टीने या पुढील ध्वजारोहणाचे सर्व मुख्य शासकीय समारंभ हे मा.उपविभागीय अधिकारी पेण यांचे कार्यालयाचे प्रांगणात संपन्न होणार आहेत .त्या दृष्टीने सर्व पत्रकार बंधू यांनी आपल्या मार्फत देखील सर्व नागरिकांना आपल्या वर्तमानपत्रात यथोचित प्रसिद्ध देऊन अवगत करावे. सर्वांनी मुख्य ध्वजारोहणास 15 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर

मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...