मुंबई(पंकजकुमार पाटील) : नवनवीन उपक्रम,कार्यक्रम, राबवून कांजूर- नाहूर पूर्व येथील गाबीत समाज संस्था अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून संस्थेच्या वतीने रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वा. गाबीत समाज भवन सभागृह, प्रेमनगर जवळ, कांजूरमार्ग (पूर्व) मुंबई याठिकाणी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास श्री. सुजय धुरत (गाबीतसमाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष )श्री. उदय अनंत माळगावकर(मोटिवेशनल स्पीकर ) ,श्री. पद्माकर हिरनाईक( आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते ) श्री. रतनकुमार झाजम -,श्री. सचिन ज्ञानदेव करंजे गाबीत सेवक,श्री. प्रदीप दत्ताराम मणचेकर - हे सर्व गाबीत सेवक आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थी वर्गास शैक्षणिक व करिअर संबंधी छानरित्या मार्गदर्शन केले. करिअरची योग्य निवड योग्य वयात करून कसे यशस्वी व्हायचे, नोकरीत उद्योग वा व्यवसाय याचा शोध घेऊन पुढे कसे जायचे, तसेच आपल्या ज्ञानाचा वापर समाज, देशासाठी कसा करता येईल यासह इतर अनेक महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणातून त्यांनी मांडले. यावेळी गाबीत समाजातील दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह त्यांच्या पालकांचा शाल,तुळशी रोप, स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा