आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

आंगवली (लाखणवाडी)ची सुकन्या कु.आश्लेषा रमेश गुडेकर वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेटलीपटिंग स्पर्धामध्ये ब्रॉन्झ पदकाची मानकरी

मुंबई (शांताराम गुडेकर) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.आंगवली (लाखणवाडी) येथील सुपुत्र सध्या मुंबई पूर्व उपनगर मधील भांडुप येथे राहत असलेल्या श्री.रमेश श्रीपत गुडेकर यांची सुकन्या कुमारी असलेल्या रमेश गुडेकर हिने वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेटलीपटिंग स्पर्धामध्ये आपल्या कमी वयात मनाचा तुरा रोवून बेंच प्रेस मध्ये ब्रॉन्झ पदक पटकवात आंगवली गावचे नाव रोशन केले.यापूर्वी तीने डेडलीफ्ट मध्ये गोल्ड, इन्टेरेस्टटे सिल्वर,ऑलव्हर ब्रॉन्झ, पार्टीसिपशन मेडल असे पाच पदके जिंकली आहेत. २०-२५ ऑगस्ट २०२४दरम्यान झालेल्या सिनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप -कोलकाता पॉवरलीफिटिंग इंडिया असोसिएशनमध्ये चांगले यश संपादन केल्याने तिच्यावर आंगवली(लाखणवाडी ) येथील चैतन्य युवा मंडळ आंगवली लाखणवाडी या मंडळाचे सदस्य रमेश गुडेकर आणि परिवार तसेच आश्लेषा हिचे कौतुक होत असून अनेकांनी तिला अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत.तीचे प्राथमिक शिक्षण सुभाष बने यांच्या पराग विद्यालय मध्ये झाले असून ती मुंबई मधील रुईया कॉलेजमधून पदवीधर (बी.एम.एम) झाली आहे.आत्तापर्यंत तिला गोल्ड -२७,सिल्व्हर -९, ब्राँझ-२ अशी एकूण-३८ पदके मिळालेली आहेत.यामध्ये ज्युनिअर ग्रुपमधून गोल्ड,सिल्व्हर, ब्राँझ चा समावेश आहे.नॅशनल,स्टेट,डिस्ट्रिक्ट लेवलला ती खेळली आहे. तर सिनियर ग्रुप मधून (जुलै२०२४ ) पासून स्टेट लेव्हल- १ गोल्ड मेडल,नॅशनल लेव्हल ब्राँझ मेडल ची मानकरी आहे.
               भावी आयुष्यात तिने तुकाराम मुंडे यांच्यासारखे निर्भीड,एक स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी बनण्याचा तिचा मानस आहे.तो लवकरच पूर्णही होईल यात शंका नाही. कारण तिने गेल्या चार -पाच वर्षात एक डझन पेक्षा जास्त पदक या स्पर्धामध्ये मिळवली आहेत. तिचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे मत यानिमित्ताने मंडळाचे अध्यक्ष संदीप लाखन यांनी व्यक्त केले आहे.त्याच बरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, विद्यमान आमदार शेखर निकम, वशिस्ट मिल्क अध्यक्ष प्रशांत यादव,स्मिता लाड,माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद संतोष थेराडे,उद्धव ठाकरे गट यांचे संगमेश्वर तालुका प्रमुख बंडया बोरुकर, जिल्हा प्रमुख विलास चाळके, महिला जिल्हा प्रमुख वेदा ताई फडके,माजी जिल्हा परिषद सदस्य मुग्धा ताई जागुष्टे, सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी सभापती संतोष डावल, माजी सभापती मधुकर गुरव, संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार बंधू यांनी आश्लेषा रमेश गुडेकर हिला पुढील आयुष्यासाठी चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सचिन तेंडुलकर,सानिया नेहवाल,आकांक्षा कदम यांच्या सारखे उत्कृष्ट खेळाडू बनवून तिने आपल्या गावाचे, वाडीचे,मंडळाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छा देत अभिनंदन केले.
               आपल्या कमी वयात यश संपादन केल्यान तिच्यावर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, मंडळ,समाज शाखा यांच्यातर्फे अभिनंदन केले जात आहे. सचिन तेंडुलकर, सानिया नेहवालआकांशा कदम यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन उत्तम खेळाडू तर तुकाराम मुंडे यांच्यासारखा निर्भीड अधिकारी यांचा आदर्श ठेवून तिने उंच भरारी घेण्याचे तिचे स्वप्न उराशी बाळगले आहे.तिला एक आय.पी.एस अधिकारी बनायचे तिचे स्वप्न आहे.तिचे ते स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे या साठी लागेल ती मदत तिला करणासाठी आंगवली( लाखणवाडी )चे निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी सांगितले आहे. तिच्या या यशा मागे तिचे कोच निलेश गराटे यांनी तिला चांगले मार्गदर्शन केल्यामुळे त्याचबरोबर तिचे आई -वडील यांनी वेळो वेळो चांगले सहकार्य केल्यामुळे तिने एक डझन पेक्षा जास्त पदक मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तिला कोणत्याही क्रीडा क्षेत्रात जी काही मदत लागेल ती मदत करू असे शशांक घडशी, सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी सांगितले.लवकरच गणपती उत्सवमध्ये तिचा चैतन्य युवा मंडळ यांच्यावतीने सत्कार मु. पो.आंगवली (लाखणवाडी) येथे केला जाईल असे मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप लाखन यांनी सांगितले. तिच्या या यशा मागे तिचे वडील -आई भाऊ, क्रीडा कोच निलेश गराटे यांची विशेष मेहनत आहे.त्याचबरोबर मंडळातील सर्व सदस्य यांचे बहुमूल्य मार्गदर्शन असल्याने तिने हे यश संपादन केले आहे असे आश्लेषा रमेश गुडेकर हिने बोलताना सांगितले.तिने आपल्या आई- वडील यांच्या बरोबर आंगवली गावाचे,लाखणवाडीचे त्याच बरोबर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुकाचे नाव जगाच्या नकाशा वर नेऊन ठेवत उंच भरारी घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...