आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ जुलै, २०२४

शिंपी समाजातील २५ गरीब होतकरू मुलांचे पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व बालन ग्रुप स्विकारेल - मा. पुनीतदादा बालन

मुंबई (गणेश हिरवे) सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गुरूपौर्णिमा निमित्ताने नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे वतीने लक्ष्मी रोड वरील मलाबार गोल्ड शोरूमच्या हाॅलमध्ये मा. पुनीतदादा बालन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. स.प पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके यांनी पुणे शहर शाखेच्या कार्याचा उल्लेख करून मा. पुनीतदादा बालन याचे सामाजिक कार्याचा योगदानाबद्दल उपस्थितांना माहीती दिली. यावेळी मलाबारचे गोल्डच्या व्यवस्थापिका सौ. दिक्षा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.सामाजिक बांधिलकी म्हणून शिंपी समाजातील २५ गरीब होतकरू मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व बालन ग्रुप स्विकारेल असे पुनीतदादा बालन यांनी सत्काराला उत्तर देताना जाहीर केले.  
      यावेळी ना.स.प.पुणे विभागीय उपाध्यक्षपद रणजित माळवदे, पुणे जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, पुणे शहराचे सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष सुभाष पांढरकामे, कुंदन गोरटे, सोमनाथ मेटे, राहुल सुपेकर, स्वप्निल खुर्द, शिवाजी माळवदकर, प्रशांत भोंडवे, अरूण काळे, मदन लंगडे, नितीन लचके, शंकर खांबेकर, अक्षय लचके, सौ. शोभा मुळे, सौ. ललिता पांढरकामे, सौ. सुजाता माळवदे, सौ.स्मिता भोडवे, सौ. रूपा माळवदकर, सौ. निता खांबेकर उपस्थित होते अशी माहिती पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...