आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ जुलै, २०२४

रायगड जिल्हा परिषद तर्फे समाज कल्याण विभागामार्फत अर्थसंकल्प योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन!

गडब(अवंतिका म्हात्रे) रायगड जिल्हा परिषदेच्या सन २०२४-२५ चा अर्थसंकल्पात ५% कल्याण निधीमधून वैयक्तिक अर्थसाहाय्य लाभाच्या योजना DBT तत्वावर राबवण्यात येणार आहेत. सदर योजनांचा लाभ रायगड जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन ,डॉ.भरत बास्टेवाड (भा.प्र.से) रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. 
    सदर योजनेत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (वेंडिंग स्टॉल पीठ गिरणी शिलाई मशीन मिरची कंडोम मशीन झेरॉक्स मशीन इत्यादी,) दिव्यांग व्यक्तींना घरकुल पुरविणे दिव्यांग पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे दिव्यांग अव्यंग व्यक्तींची विवाहित त्यांना आर्थिक सहाय्य देणे (१७ जून २०१४ नंतरचे विवाहित जोडपे असणे आवश्यक आहे, दिव्यांग क्षेत्रात कार्यरत व्यक्ती नोंदणीकृत संस्था यांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करणे, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार थेरपी साठी अर्थसहाय्य देणे (फिजिओथेरपी स्पीच थेरपी पंचर ॲक्युपंचर इत्यादी), मतिमंद व्यक्तींकरिता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनेचे अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे, कर्णबधिर मुलांच्या क्लिअर इम्प्लेंट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी ई टेम्पो रिक्षा पुरविणे.
वरिल योजनांसाठी खालील प्रमाणे निकष लावणे आत्यावश्यक आहे -
१) विहित नमुन्यातील अर्ज
२)रायगड जिल्ह्याचा रहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत
३)ऑनलाइन वैश्विक प्रमाणपत्र(UDID) वैद्यकीय मंडळाकडील किमान 40 टक्के दिव्यांगत्त्वाचा दाखला
४) सक्षम प्राधिकार्‍याचा उत्पन्नाचा वार्षिक दाखला( १,०००००/ च्या आतील )अथवा कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असल्याचा संबंधित ग्रामसेवकाचा दाखला
५)मतिमंद व बहु विकलांग पाल्याच्या पालकास लाभासाठी पात्र ठरविण्यात येईल(पाल्याच्या अपंगत्वाचा दाखला सादर करणे अनिवार्य)
६)यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
७)बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
८) घरकुल योजनेसाठी असेसमेंट व घराच्या सद्यस्थितीचा फोटो आवश्यक आहे
    उपरोक्त योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी साधारणता 30 जुलै 2024 पूर्वी संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे कार्यालयाशी संबंध साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा व आवश्यक सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह परिपूर्ण अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...