मुंबई (प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट गावातील सडेवाडीचे सुपुत्र श्री.महादेव सखाराम कोकमकर यांचे शनिवार दि.२०/०७/२०२४ रोजी निधन झाले.मुंबईत असताना रंग काम करून मुले आणि पत्नी अशा परिवाराचा सांभाळ करता करता तेवढ्याच आवडीने नमन कला ही जोपासत होते.नमन हा त्यांचा आवडता छंद होता.कामानिमित्त मुंबई किंवा गोवा या ठिकाणी असले तरी नमनसाठी आवर्जून ते उपस्थिती असायचे.ते मृदुंग वाजवण्यात पटाईत होते.अनेक वर्ष श्री. सोमेश्वर नमन मंडळ कळंबट या नमन मंडळात मृदुंगमणी म्हणून नावाजलेले व्यक्तिमत्व.त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नमनमध्ये परिधान करणाऱ्या कपड्यांमधील लाल रंगाचा फेटा बांधून त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी,३मुलगे,३ मुली,सून,जावई आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.निलेश कोकमकर मुंबई सह ठाणे,पालघर,नाशिक,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन प्रसिद्ध होणाऱ्या निर्भीड दै.अग्रलेखचे मुंबई उपनगर विभागात प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.नमन कलेतील अनेक कलाकार, अन्य मान्यवरांसह दै.अग्रलेख संपादक उमेशजी भेरे,अग्रलेख पत्रकार समूह आणि पत्रकार दिपक कारकर, शांताराम गुडेकर,माहिती अधिकार,पोलीस मित्र,पत्रकार संरक्षण सेना मुंबई पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर
डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा