आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ जुलै, २०२४

सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांची जागरूकता कामी आली..!!

मुंबई( पूनम पाटगावे)जोगेश्वरी पूर्व सुभाष रोड येथे दीन ठिकाणी ड्रेनेज साधारण दोन आठवड्या पासून चोक अप होऊन त्यातून घाण पाणी रस्त्यावर वाहत होते पण त्या विभागातील नगरसेवक, आमदार, खासदार किंवा ज्या ठिकाणी ती समस्या होती तेथील (श्री जी इंडस्ट्रिअल इस्टेट आणि सुभाष नगर रस्ता जिथे सुरू होतो तिथे) कारखानदार मालक यांनी देखील याबदल साधी तसदी घेतली नाही.जेव्हा हा प्रॉब्लेम हिरवे यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी लागलीच मुंबई महानगर पालिकेच्या कंट्रोल रूम फोन (तक्रार नंबर 0722856540 दिनांक २१ जुलै २०२४) याविषयी सूचित करून त्यांच्या पाठीमागे लागून यासाठी प्रयत्न करून आज ते बाहेर येणारे पाणी बंद करून घेतले. 
     खर तर आपण ज्या विभागातून निवडून येतो तिथे कोणत्या नागरी सुविधा अडचण आहे याची दखल त्या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी दर महिन्यात, पंधरा दिवसांनी घ्यायला हवी..पूर्वीचे लोकप्रतिनिधी जनता दरबार भरवून आपल्या विभागातील समस्या जाणून घ्यायचे, सोडवायचे..स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देखील वर्तमान पत्रात एखादे समस्या पात्र वाचण्यात आले तर आपल्या लोकप्रतिनिधींना ते दाखवून त्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्ययचे.पण सध्या लोकप्रतिनिधी समस्या जाणून घेत नसल्या मुळे याबदल हिरवे यांनी नाराजी व्यक्त केली...एकदा निवडून आल्यावर कोण जनता आणि कसले काय ? जनतेला वाऱ्यावर सोडायला लोकप्रतिनिधी तयार असतात..तेव्हा असे होता कामा नये..आणि यासाठी त्या त्या लोकप्रतिनिधींनी तत्पर राहून विभागातील समस्या सोडवाव्यात..तरच तुम्ही जनतेच्या मनातील लोकप्रतिनिधी होऊ शकाल. हिरवे यांनी पुढाकार घेऊन काम केल्या बद्दल अनेकांनी भेटून त्यांचे आभार मानले आहेत.याआधी देखील हिरवे यांनी विभागातील अनेक नागरी समस्या प्रामाणिकपणे सोडवल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...