आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३१ जुलै, २०२४

नेरुळ येथील वाॅर्ड क्र. ९० मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न

नवी मुंबई ( सुभाष हांडे देशमुख ):  नेरुळ उपनगरातील सेक्टर ९ मधील वाॅर्ड क्र.९० मध्ये मा.नगरसेविका सौ. मीरा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा मा.आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते दिनांक २७ जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रविंद्र इथापे, मा.नगरसेवक सुरेश शेट्टी, मा. नगरसेविका सौ. सुरेखा इथापे, दत्त मंदिराचे दिगंबर महाराज, महिला प्रमुख सौ. रुचिता कर्पे, रविंद्र ढोले तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.         
        याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना संदीप नाईक म्हणाले की, मीरा पाटील ह्या सामाजिक चळवळीतील निष्ठेने काम करणाऱ्या नगरसेविका असून त्यांनी या परिसरात अतिशय चांगल्या पध्दतीने जनतेची, सर्वसामान्यांची कामे केली असुन त्यांच्या माध्यमातून पक्षाला या परिसरात एक चांगल्या अनुभवी नगरसेविका भेटल्या आहेत. त्यांच्यामुळे येथे निश्चित स्वरुपात भाजपची ताकद अधिक वाढेल याचा विश्वास आहे.  
    रविंद्र इथापे यांनी सांगितले की मीरा पाटील यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षांत या वाॅर्डमध्ये जनतेची सर्व स्तरावर चांगली सेवा केली असून या वाॅर्डात नमुंमनपाच्या माध्यमातून अनेक विकासकामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत. आमदार गणेश नाईक व जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली या वाॅर्डात भाजपाचा महापालिकेवर झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून त्यांनी सांगितले की, आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू.
       संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र माळी यांनी केले. सौ. मीरा पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून सांगितले की, मी भाजप पक्षाचे निष्ठेने काम करीन. आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेईल.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय निंबाळकर, दिनेश गवळी, मनसुख सावलिया, रंगनाथ नलावडे, रोहिणी दरेकर, सुलोचना सावलिया, रेणुका सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांनी अपूर्व मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...