आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३० जुलै, २०२४

शिवसेना उरण शहर शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन

पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक व सामाजिक व उपक्रम
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उरण शहर शाखेच्या वतीने पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि २९/७/२०२४ रोजी श्रीराम मंदिर सभागृहामध्ये सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे सामाजिक बांधिलकी जपत आयोजन करण्यात आले होते, यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब व गरजूंना मोफत वह्यांचे वाटप, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप असे विविध उपक्रमाचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उरण मध्ये निर्घृण हत्या झालेल्या कु यशश्री शिंदे हिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले शिवसेना मावळ संपर्क नेते व आमदार सचिनभाऊ अहिर यांनी शिवसेना उरण शहराच्या कार्याचे कौतूक करून व गुणवंत विद्यार्थ्यांना खूप शिकून, मोठे व्हा असा मौलिक सल्ला दिला.तसेच शिवसेनेच्या वतीने गेली ४० वर्ष सामाजिक व शैक्षणिक उपक्रम हे उरण शहरात राबविले जात असतात, ही खूपच कौतुस्कापद व अभिमानाची बाब आहे असेही त्यांनी नमूद करून माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी कोरोना काळातही रात्रंदिवस जनतेची सेवा केली. आजही ते उत्तमपणे कार्य करत आहेत. त्यामुळे संपूर्ण जनता ही माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या पाठिशी आहे असे गौरवोदगार मावळ संपर्कनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी काढले. तसेच लवकरच उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांसाठी संघटनात्मक शिबिराचे आयोजित केले जाईल असे त्यांनी जाहीर केले.    यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी आपल्या प्रस्तावनेत गेली ४० वर्षाहून जास्त वर्षे शिवसेना उरण शहरात सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, गोर गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षण थांबू नये यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा गुण गौरव करण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम तर जेष्ठ नागरिकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्री वाटप असे कार्यक्रम राबवित असतो. या सर्व कार्यक्रमांना जनतेचा नेहमी उत्तम प्रतिसाद मिळतो असे सांगत गणेश शिंदे यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रम घेण्या मागची भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही आपल्या मनोगतात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना उरण शहर शाखेचे वतीने राबवले जाणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. येणाऱ्या विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदिनिशी निवडणुकीला सामोरे जाणार आहे, तरी कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी मनोगतात त्यांनी उरण शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले व उरण शहरात संघटनात्मक बांधणी चांगली करावी अशी सूचनाही केली. यावेळी पालघर जिल्हा वक्ता मनीषा ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर नितेश पंडित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
    यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उपतालुका प्रमुख प्रदिप ठाकूर, उपतालुका संघटक के एम घरत, उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, माजी शहर प्रमुख महेंद्र पाटील, नगरसेवक अतूल ठाकूर, समीर मुकरी, विधी व न्याय सेलच्या तालुकाध्यक्ष व नगरसेविका वर्षा पठारे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील, माजी तालुका रंजना तांडेल, ज्येष्ठ कार्यकर्ते पाटील सर, नंदू पाटील, गुलजार भाटकर व सोशल मीडिया संगणक नितीन ठाकूर,जेष्ठ पत्रकार घनश्याम कडू उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक दिलीप रहाळकर उपशहरप्रमुख कैलास पाटील अरविंद पाटील, तालुका संघटका (शहर) सुजाता गायकवाड, शहर संघटिका विना तलरेजा, शहर संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, रझिया शेख, विभाग संघटिका रूपा सिंग, कल्पना गराडे, शाखा संघटिका कविता गाडे, संजना कोष्टी, हसीमा सरदार, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष हुसेना शेख, विभागप्रमुख वैभव करंगुटकर, गणेश शेलार, ग्राहक संरक्षण कक्षाचे संघटक संदीप जाधव, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, आबा नार्वेकर, राकेश कोळी, कपिल फसाटे, शाहरूख गडी, फत्तेखान, संदीप चव्हाण, उरण शहरातील पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व शिवसैनिक यांनी केले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आले. तर गरिब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे पावसांपासून संरक्षण व्हावे यासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले,तसेच बालगाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी श्री राम मंदिर सभागृह विद्यार्थी, पालक, नागरिकांनी भरून गेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...