नवी मुंबई( सुभाष हांडे देशमुख): शिक्षा सप्ताह निमित्ताने नवी मुंबईतील शिरवणे विद्यालयात आरोग्याविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती व मानसिक स्वास्थ्य याविषयी मार्गदर्शन शिबिर दिनांक २७ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आले. याप्रसंगी नेरुळ येथील आनंद हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुहास जाधवर, डॉ. आश्विनी जाधवर तसेच डॉ. वंदना कुचिक मॅडम सिनियर फॅमिली फिजिशियन कोपरखैरणे व डॉ. रविंद्र गोसावी सिद्धिविनायक केअर सेंटर तुर्भे, फॅमिली फिजिशियन अँड सर्जन ह्यांनी विद्यालयातील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ आश्विनी जाधवर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना Good touch, Bad touch तसेच cervical vaccine and importance in prevention of cancer cervix and uterus याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ रविंद्र गोसावी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची व्याख्या सांगताना शारीरिक, मानसिक, सामाजिक व निरोगी ऊर्जा जपून समाजहित कसे साधता येईल ह्यावर मार्गदर्शन केले. नेहमी डायरी लिहिण्याची चांगली सवय लावावी, सकाळी लवकर उठून सकाळची सुरवात सकारात्मक विचारातून करताना स्वतःशी सुसंवाद साधत मी एक शक्तिशाली आत्मा आहे, सारे ब्रह्मांड मला यशस्वी करण्यास मदत करत आहे, मी माझ्या आई वडिलांचा, शिक्षकांचा महिलांचा नेहमीच सन्मान करेन. मी माझ्या देशाच्या सन्मान वाढवणाऱ्या सर्व गोष्टी करणार आहे. द्वेष, लोभ, मत्सर यांना महत्त्व न देता मैत्री जोपासेन असे म्हणावे म्हणजे आपले मनोबल वाढण्यासाठी मदत होईल असे सांगितले. स्वावलंबन अंगी रुजवताना स्वतःच्या अंथरुणाच्या घडी स्वतःच घालणे, घरातील छोटी छोटी कामे करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे व्यायाम, धावणे सांघिक खेळ जोपासण्यास सांगितले.
बाहेरील खाद्यपदार्थ, सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स, बिस्किट्स, नूडल. जंक फूड आरोग्यास हानिकारक असून ते टाळणे गरजेचे आहे हे सांगितले. सर्व धर्माचा आदर, पर्यावरणाची काळजी, आपले मन प्रसन्न ठेवताना मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ह्या उक्तीचे विश्लेषण केले. एकमेकांना अडचणीच्या काळात मदत करावी, कौतुक प्रणाली मनामधे रुजवावी. द्वेष, लोभ, मत्सर यांना महत्त्व न देता मैत्री वाढवावी. पण एखादा मित्र चुकत असेल, व्यसनाकडे आकर्षित होत असेल तर त्याला त्या व्यसनापासून परावृत्त केले पाहिजे, अयोग्य गोष्टींना नाही म्हणायला शिकले पाहिजे त्यामुळे अनेक धोके व जीवनातील वाईट प्रसंग टाळू शकतो व मोबाईलचे व्यसन व त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम त्यावरही डॉ. गोसावी सरांनी आपले विचार मांडले.
वाईट सवयींचे आपण गुलाम होणे टाळले पाहिजे. आपण राहतो त्या ठिकाणची हवा, पाणी, रस्ते स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे ज्यामुळे आपले आरोग्य निरोगी रहील व आपण देशाचे जबाबदार नागरिक बनू असेही डॉ रविंद्र गोसावी म्हणाले.
डॉ वंदना कुचिक मॅडम यांनी मुलांच्या आहाराविषयी बोलताना, समतोल आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ज्वारी, गहु, बाजरी, धान्य व सोयाबीन, सर्व प्रकारच्या डाळी, कंदमुळे, सर्व प्रकारच्या रानभाज्या व समुद्रातील मासे, इत्यादी अन्नपदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा व त्याचे महत्व मुलांना समजेल ह्या भाषेत एका अनोख्या शैलीत सांगितले. तसेच शिळे अन्न बाहेरील उघड्यावरचे पदार्थ उदा. चायनीज पदार्थ यापासून शरीरावर होणाऱे दुष्परिणाम विषद केले. त्याचप्रमाणे उपस्थित असणार्या ७ वी ते १०वी च्या विद्यार्थिनींना मासिक पाळी व पाळीच्या वेळी घेतली जाणारी काळजी यावर मार्गदर्शन केले.
मुलींनी आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज एक तास व्यायाम किंवा खेळ खेळला पाहिजे असेही डॉ. कुचिक यांनी सुचित केले.
शिरवणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी उपस्थित सर्व सन्मानीय डॉक्टरांचे स्वागत केले व आभार मानले. ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रदीप पाटील सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा