आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

नवभारत हायस्कूल कुसूर* येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न ; साई एज्युकेअर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...!

वैभववाडी - कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative ) माध्यमातून मोफत ई - लर्निग सिलेबस किट (५ वी ते १० वी), एक लॅपटॉप आणि प्रिंटर, स्कॅनर, झेरॉक्स मशीन इत्यादी शालेय साहित्य शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन क्षिरसागर सर आणि सहायक शिक्षक श्री भरत पाटील सर यांच्याकडे कु . साई सुरेश पाटील याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ यामध्ये केंद्र सरकार तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता ८ वी NHMS परिक्षेत उत्कृष्ट यश आणि शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या कु. सोहम संदिप पाटील आणि कु. सानवी संतोष शिंदे या यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले.
   सदर कार्यक्रम प्रसंगी साई एज्युकेअर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील, सचिव श्री निखिल कुडतरकर, खजिनदार सौ वृषाली सुरेश पाटील, कार्याध्यक्ष श्री अदित्य पतियाणे, सहकार्याध्यक्ष पारस अनिल पाटील तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष कार्यकारी अधिकारी श्री महेश रावराणे, तसेच शाळेचे शिक्षकवर्ग ही उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...