आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २० एप्रिल, २०२४

सिने-नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण आणि विशेष गौरव प्रदान सोहळा .. !

मुंबई-परळ ( गुरुनाथ तिरपणकर) आर्यारवी एंटरटेनमेंटच्या पहिल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते महेश्वर भिकाजी तेटांंबे यांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावसकर हॉल, दुसरा मजला, नायगांव, दादर (पूर्व) येथे शनिवारी दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सिने-नाट्य क्षेत्रांतील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजीत केले असुन या सोहळ्यात विजेत्या लघुपटांना रोख पारितोषिके आणि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आह़े. शिवाय कला, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळागाळातील कलावंत, तंत्रज्ञ यांना रंगकर्मी, कलाभूषण, समाजभूषण तसेच जीवनगौरव आदी पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आह़े. या सोहळ्यात उपस्थित मान्यवर म्हणुन "कुटुंब रंगलंय काव्यात" चे सादरकर्ते प्रा.विसुभाऊ बापट, प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर, प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगांवकर, संजय सावंत, एन.डी.खान, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, गीता कुडाळकर, दै.आपलं नवे शहर चे उपसंपादक राजेंद्र घरत, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक विलास (बाळा) चोकेकर, अँड.सुनिल शिर्के, डॉ.किशोर खुशाले, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या लघुपट सोहळ्यासाठी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अनंत सुतार, अभिनेता,निर्माता सुरेश डाळे व ग्राफीक डिझायनर, समाजसेवक मनिष व्हटकर, अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता आणि सोनाली पेडणेकर यांनी विशेष मेहनत घेतली असुन सर्व थरांतील व्यक्तींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी केले आह़े.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...