आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २० एप्रिल, २०२४

प्रसिध्द कवयित्री स्नेहाराणी गायकवाड यांना तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार !!

मुंबई: एस एस सिनेव्हिजन व आझाद फाऊंडेशन यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात, कला, क्रीडा, प्रशासकीय, सामाजिक, राजकिय, उद्योग, शिक्षण, आरोग्य, संस्कृतीक या क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या प्रतिभावंत महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येतो ,जेणे करून त्यांचा उत्साह वाढवा आणि इतरांना देखील त्यांच्या कर्तबगारीची प्रेरणा मिळावी या हेतूने दर वर्षी हा पुरस्कार सोहळा सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद यांच्या संकल्पनेतून आयोजित केला जातो .यंदा तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील 160 प्रतिभावंत महिलांचा सन्मान मोठया दिमाखदार आणि सिनेसृष्टी, प्रशासकीय सेवेतील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यात नवी मुंबई येथील प्रसिध्द कवयित्री स्नेहाराणी गायकवाड यांना साहित्यातील भरीव कामगिरी साठी "तेजस्विनी महाराष्ट्राची" हा मानाचा पुरस्कार भव्य समारंभात देण्यात आला.
      दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्पना कपीले, पोलीस उपसंचालक (पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई) ए सी पी संजय पाटील, अनेक सुपरहिट चित्रपट आणि टीव्ही सिरीयल चे दिग्दर्शक अर्शद खान, क्रिएटिव्ह व रियालिटी शोज चे दिग्दर्शक सलीम शेख, प्रसिध्द संगीत दिग्दर्शक हुमायू कबीर, सारेगम फेम गायिका निरुपमा डे, अभिनेत्री सिद्धी कामत, भारत सरकारच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय धावपटू इब्राहिम अरेभावी, रोजगानिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टॅलेंट कॉर्प सोल्यूशन चे संचालक डॉ. महेबुब सय्यद या दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन टाईम्स ऑफ पुणे चे सतीश राठोड आणि स्नेहा कुलकर्णी यांनी केले. हा पुरस्कार मिळाल्यामुळे कवयित्री स्नेहाराणी यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे़ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...