आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

पालघर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग मधील १० शाळांमध्ये "ई -प्रशाला" प्रकल्पाची सुरुवात

मुंबई (शांताराम गुडेकर ) रत्नागिरी,पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी "ई -प्रशाला" राबवण्यात आला.पालघर जिल्ह्यातील नूतन विद्यालय,बहांडोली शाळेमध्ये या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.
              रेनोवेट इंडिया,अजिंक्य युवा प्रतिष्ठान संस्थाच्या संयुक्त प्रयत्नातून तसेच मोसंबी या कंपनीच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प राबवण्यात आला.यामध्ये निवडक दहा शाळांमध्ये आधुनिक प्रोजेक्टर आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थियांचे शिक्षण अधिक सोपे आणि सोयीस्कर होणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढेल,विषयांची चांगली समज येईल आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित होईल.एकूण १० शाळांमधील २४८७ विद्यार्थीना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.पालघर जिल्ह्यातील १,रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ५ शाळांमध्ये ह्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
               उद्घाटन समारंभात रेनोवेट इंडियाचे श्री.आलोक कदम यांनी तंत्रज्ञान-आधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या शाळांचे कौतुक केले. या प्रकल्पामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडून येईल असा विश्वास व्यक्त केला.अजिंक्य युवा प्रतिष्ठान आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनीही या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये "डिजिटल ई - प्रशाला " उपक्रम घेऊन जाण्यास जी संधी रिनोव्हेंट इंडिया आणि मोसंबी कंपनी ने दिली त्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक आभार अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...