आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली चारकोप तर्फे आदिवासी भागात रुग्णांना मोफत साहित्य वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर/मोहन कदम) साई भावी सेवा ट्रस्टचे संचालक श्री. मंगेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली सतत वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात.यावेळी दुःखीत व्यादिने त्रस्त अशा मुलांना व जेष्ठ नागरिक यांना टिफिन सेवा व रुग्णाना मोफत सेवा साहित्य वाटप करण्यात आले आहे.तसेच यावर्षीचा आदिवासी भागात रुग्णाना मदत करण्याचा हा २३ वा कार्यक्रम चिंचघर पोस्ट कुरझें तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.एकूण ३४ जीवनावश्यक वस्तुरूपाने विशेष वाटप करण्यात आले.हे सर्व करत असताना लोकांच्या मनामध्ये जो आनंद निर्माण होतो हीच गोष्ट महत्वाची आहे.या संस्था अनेक वर्ष हेच काम करत आहेत.जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे मानून हे कार्य अहोरात चालू आहे.
       या कामी रासम परिवार,श्री.अनिल वडके,सौ.अनिता वडके,जननी फॉउंडेशन श्री. /सौ. पुष्पा शंकर भालेराव,जाणीव ग्रुप जोगेश्वरी, महेश मेहता ग्रुप, प्रीती भुच,शरद नाक्ती,ग्लडी डिसोझा ,प्रकाश राशींकर, प्रशांत पिळे,भाविन पांचाळ, तुशीदास तांडेल, दीपक आकरे,रामकिरण गुप्ता,यशवंत वालास,अंतेश्वर पाटील,दर्शना पाटील,आस्विनी घोडडे,नवनाथ हंबीरे या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्सवात कार्यक्रम संपन्न झाला.साई परिवाराचे मंगेश रासम व अनिल वडके यांनी सर्वाचे मनस्वी आभार मानले. ही सेवा आणखी वाढावी असा अभिप्रायही सर्वानी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...