गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४
दादर येथील अंध शाळेत ६०विद्यार्थांना शारीरिक शिक्षणाचे(पी.टी.)गणवेशाचे वाटप
मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)-सहानुभूती नाही तर सहकार्य करणे महत्वाचे आहे ही भावना व सामाजिक बांधिलकी जपत दादर येथील श्रीमती कमला मेहता स्कूल फाॅर द ब्लाइंड या शाळेत ओएनजीसी ऑफीसर्स महिला समिती बांद्रा यांच्या तर्फे६०विद्यार्थ्यांना पौष्टीक आहार व शारीरिक शिक्षणाचे(पी.टी.)गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच एका गरजू विद्यार्थीनीला औषध उपचारासाठी आर्थिक सहाय्यही करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन स्नेह फाऊंडेशन व आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाऊंडेशन चा दोन सामाजिक संस्थांमार्फत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी ओएनजीसी ऑफीसर्स महिला समितीच्या अध्यक्षा श्रृती शंकर,उपाध्यक्षा रश्मी इनामदार,सचिव किरण सिंग,खजिनदार समता जैन,सोशल इन्जार्ज तृप्ती चतुर्वेदी,कल्चरल इन्चार्ज गीता,विम्मी शरण,रेणू सागर,रोहिणी संतोष,प्रेरणा कुमार,निलिमा पाटील,स्नेह फाउंडेशनच्या अध्यक्षा डाॅ.स्नेहा कदम,डाॅ.विनीत आल्हाट,तसेच आदर्श सिद्धांत वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक शैलेश विवेकानंद सोनावणे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सुंदर असे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरूवात केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी महाडीलकर यांनी केले.उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेली रोपे भेट देवून सन्मान करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी सर्व पदाधिका-यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
हिंदी विद्या प्रचार समितीचा ८८ वा स्थापना दिन उत्साहात संपन्न
मुंबई(शांताराम गुडेकर ) घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथील हिंदी विद्या प्रचार समितीचा ८८ वा स्थापना दिन सोहळा श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी शनिवार...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा