मुंबई (शांताराम गुडेकर) रोचिराम टी थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप या शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री वर्तक यांची नुकतीच दिव्यांग क्रिकेट बोर्ड ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी आणि प्रेसिडेंट ऑफ डीएसएब्ल्ड क्रिकेट डेव्हलेपमेंट असोसिएशनच्या जागी निवड करण्यात आली . दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. आग्रा येथे ही सभा घेण्यात आली होती. यावेळी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष मुकेश कांचन , उपाध्यक्ष डॉ भगवान तलवारे, अध्यक्ष इकरांत शर्मा , हरून रशीद , गझल खान , डॉ रामजी चंदरवाल, मनीषा प्रसाद आदी उपस्थित होते.
भाग्यश्री वर्तक या गेली 33 वर्ष दिव्यांगाना शिकवत आहेत. बिग सिनेमा मध्ये दाखवलेल्या राष्ट्रगीताच्या त्या सहायक होत्या. अकिरा या सिनेमात त्यांनी सोनाक्षी सिन्हा यांना खुणा शिकवल्या आहेत. दादा या शॉर्ट फिल्मच्या त्या सहनिर्मात्या आहेत. रोहिणी हट्टंगडी, पुष्कर श्रोत्री , सुनील बर्वे यासारख्या मराठीतील प्रसिद्ध कलाकारांना घेऊन त्यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्याच बरोबर त्यांनी 2 वर्षापूर्वी शुभ्रा हा प्रकल्प सुरू केला होता. त्यातून त्यांनी आदिवासी आणि कर्णबधिर व्यक्तीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. भाग्यश्री वर्तक याना सामाजिक कार्य बद्दल 30 हून अधिक पुरस्कार देखील मिळाले आहे. कर्तबगार अशा दिव्यांग मुली शोधून त्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायचे हे कार्य ते करत आहेत. चांगले दिव्यांग क्रिकेटपटू घडवणे हाच माझा उद्देश असल्याचे यावेळी भाग्यश्री वर्तक म्हणाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा