घाटकोपर (शांताराम गुडेकर ) ज्यांना सत्ता आणि पैशाची भूक आहे ते पक्ष सोडून जात असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचारांशी , तत्वांशी ठाम असलेले कार्यकर्ते पक्षात कट्टर आहेत. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिकवण घेऊन आम्ही पुन्हा नव्या जोमाने घरोघरी जाऊन पक्ष वाढीसाठी काम करत आहोत. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाना शब्द देतो घाटकोपर आणि मानखुर्द मधून शिवसेनेचे दोन आमदार शंभर टक्के निवडून आणणार असे आश्वासन इम्रान शेख यांनी आपले भाषण प्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले. इम्रान शेख यांची पक्षाच्या घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा गांगावाडी येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नव्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी दिली जात आहे. घाटकोपर पश्चिम मधून इम्रान शेख यांचा जनसंपर्क मोठा असून त्याचे सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फौज त्याच्या मागे असल्याने पक्षाने त्यांना एक मोठी जबाबदारी दिली असल्याचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यात शब्द देताना आम्ही घाटकोपर आणि मानखुर्द येथून दोन आमदार नक्की निवडून आणु अशी यावेळी शपथ देखील शेख यांनी घेतली. यावेळी विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा