आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा २६ व २७ जानेवारीला

मुंबई - (प्रतिनिधी) राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा, यंदा २६ व २७ जानेवारी रोजी सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
    कामगार मंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दिली आहे. इच्छुक कुस्तीगिरांनी २२ जानेवारी पर्यंत मंडळाच्या ललित कला भवन, १०६, वसंतदादा औद्योगिक वसाहत, यांत्रिक सुविधा केंद्र, चारुभाई शहा सांस्कृतिक संकुल, ता. जि.सांगली येथे प्रवेशिका सादर कराव्यात. स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली यांची माहिती मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत. जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड, कृपामाई हॉस्पिटलसमोर, सांगली येथे या स्पर्धा होतील. राज्य / राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जातील.
   कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रकमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.७५ हजार, द्वितीय पारितोषिक रु.५० हजार, तृतीय पारितोषिक रु.३५ हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक रु.२० हजार आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.५१ हजार, द्वितीय पारितोषिक रु.३५ हजार, तृतीय पारितोषिक रु.२० हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक रु.१० हजार आहे. तसेच विविध ५ वजनी गटात सामने होणार असून, विजेत्यांना रु.२५ हजार ते १० हजारांची पारितोषिके दिली जाणार आहेत. असे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी व प्रसिध्दी प्रमुख मनोज बागले यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...