आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

पंचायत समितीचे माजी सभापती बाळाजी म्हात्रे यांना देवाज्ञा

गडब ( अवंतिका म्हात्रे)  पंचायत समितीचे माजी सभापती बाळाजी म्हात्रे यांना देवाज्ञा झाली आहे. सामान्य कार्यकर्ता ते नेता हा प्रवास करताना त्यांचे पाय जमिनीवरच होते. बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे विश्वासु सहकारी म्हणून रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध होते. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदावर ते कार्यरत होते. पाटनेश्वर बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. RDCC बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती सदस्य म्हणून काम केले होते. पेण तालुका आगरी समाज मंचाचे आधार स्तंभ होते. रायगड जिल्यात पोल्ट्री व्यावसायिक म्हणून ते अल्पवधीत नावारूपाला आले. या व्यवसायसोबत अनेक लहानमोठे पोल्ट्री व्यावसायिक घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या परिसरातील भीषण पाणी टंचाईच्या काळात त्यांनी स्वखर्चाने टँकरने पाणी पुरवठा
केला होता. याची आठवण अजूनही जनता काढत आहे. परिसरातील शिक्षणापासून वंचितअसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शिहू येथे शाळा सुरू केली. राजकारणात ते आजात शत्रू होते. काँग्रेस पक्ष जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे.बाळाजी म्हात्रे यांच्यावर डोलवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
       त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित मुली सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सुपुत्र सुरेश म्हात्रे हे जि प माजी शिक्षण व आरोग्य सभापती होते. तर सुनबाई चंद्रकला सुरेश म्हात्रे यासुद्धा जिल्हा परिषद सदस्य होत्या.त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी आमदार रविशेठ पाटील, आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे,, माजी जि पसदस्य महादेव दिवेकर, माजी जि प सदस्य डी बी पाटील, माजी जि प सदस्य गजानन बोरकर, उद्योगजक रशादशेठ मुजावर, राजू पिचिका,ऍड. प्रवीण ठाकूर, विष्णुभाई पाटील, नरेश
गावंड, प्रसाद भोईर, वैकुंठ पाटील, अनिरुद्ध पाटील, मिलिंद पाटील, उदय जवके, नरेंद्र ठाकूर, राजू मोकल, दयानंद भगत, समीर म्हात्रे, जी डी पाटील, रविंद्र म्हात्रे, प्रशांत मोकल,अशोक म्हात्रे, शोमेर पेणकर, एल डी म्हात्रे, एल के म्हात्रे, निलेश म्हात्रे, वि बी पाटील, अरुण शिवकर, जितेंद्र ठाकूर, धर्माजीशेठ म्हात्रे,शशिकांत भगत, मुरलीधर भोईर, भालचंद्र भगत, कुमार थत्ते, रामचंद्र म्हात्रे, अमृत म्हात्रे,योगेश पाटील, प्रकाश म्हात्रे, सुनील मोकल, संतोष पाटील, विजय ठाकूर, मचिंद्र पाटील,निवृत्त न्यायाधीश पी डी म्हात्रे, हिरामण भोईर,चंद्रकांत पाटील, गणेश पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य,सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, आध्यात्मिक, क्रीडा व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
   बाळाजी म्हात्रे हे थोर नेते होते. लहानपणापासून खडतड जीवन जगले. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अपयश त्यांना माहीत नव्हते. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. एक चांगला जाणता कार्यकर्ता निघून गेला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जे केलेले कार्य आहे ते भूषणावर आहे समाजासाठी उपयोगी पडणारे आहे. - रविशेठ पाटील आमदार पेण विधानसभा सरपंचापासून जिल्हा परिषद मध्ये पोहोचण्याचा काम बाळजीशेठ म्हात्रे यांनी केले. आपली कुवत ओळखणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. गरिबीतून वर आलेली व्यक्ती पेण तालुक्यामध्ये एक वेगळं भूषण होते. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा एक नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. चांगल्या कामाचे कौतुक व चुकलो तर त्याला चूक म्हणून सांगणारा माझा खरा मार्गदर्शक आज गेला आहे. - जयंतभाई पाटील - विधानपरिषद आमदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...