आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

संत संमेलन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

नवी मुंबई ( सुभाष हांडे देशमुख): “हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे आणि धर्माचा प्रचार, प्रसार व रक्षण व्हावे हा विश्वशांतीचा संदेश अयोध्या जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज यांनी जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथील हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत दिला.”
      शिवप्रेरणा शिक्षण संस्था उंब्रज नं.२ संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोळवाडी ता.जुन्नर, जि.पुणे येथे संत संमेलन, अयोध्यानगरीचे जगद्गुरू परमहंस आचार्यजी महाराज अयोध्या तपस्वी छावणी पिठाधिश्वर व त्यांचे अनेक सहयोगी संत, महंत व काशी विद्वत परिषद प्रमुख प्रभारी विश्वगुरू सन्मानित श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरा राष्ट्रीय धर्मगुरू ह.भ.प. नामदेव महारज हरड यांचे मार्गदर्शनाखाली व जुन्नर तालुक्याचे माजी आमदार मा. बाळासाहेब दांगट यांच्या संकल्पनेतून श्रीदत्तगुरू महाराज, श्रीगणेश, श्रीसरस्वती, श्रीसाईनाथ महाराज या मूर्तिचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जगद्गुरुंच्या हस्ते नुकताच मोठया भक्तिमय व आनंदी वातावरणात हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाला.  
     जगद्गुरू व मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उपस्थित सर्वांचे स्वागत आश्रमशाळा कोळवाडीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व नृत्यातून केले. महाराष्ट्र राज्याची अस्मिता असणारे *‘महाराष्ट्र गीत’* सर्व विदयार्थी व उपस्थितांनी गाऊन राज्यागीतातून महाराष्ट्राचा सन्मान केला. संतविभूतींचे पाद्प्रक्षालन व पाद्पूजा दांगट कुटुंबियांच्या हस्ते पार पडली. तद्नंतर संतजनांचा सन्मान पुष्पहार, श्रीफळ, महावस्त्र व मेवामिठाई देऊन करण्यात आला.
     प. पू. जगद्गुरूंनी आपल्या प्रवचनातून विश्वशांतीचा संदेश देताना म्हटले की, या शिवजन्मभूमीमध्ये आल्यानंतर मला मनस्वी आनंद होत आहे. क्षत्रियकुलावतंस, राजाधिराज योगीराज धर्मरक्षक शिवछत्रपतींच्या कार्याला माझा साष्टांग प्रणिपात, हिंदू राष्ट्र जतन करण्यासाठी आपण सर्वानी धर्माचे रक्षण, प्रचार व प्रसार करावा. येत्या पाच वर्षात हे हिंदू राष्ट्र होईल असा विश्वास त्यांनी प्रसंगी व्यक्त केला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याच भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत रामदास स्वामी, संत तुकारम महारज, सद्गुरू चैतन्य स्वामी यांनी समाजाला सदमार्गाची, सद्विचारांची, सद्विवेकाची, सद्कर्माची, सत्याची दिशा दाखविली व ज्ञानामृत पाजले. जगद्गुरुंनी पृथ्वीतलावावरील पर्यावरण शुद्धी, जलशुद्धी, कन्याबचाव या गोष्टींचा मोलाचा संदेश आपल्या प्रवचनातून दिला. सर्व विदयार्थ्यांना उद्बोधन करताना जगद्गुरू पुढे म्हणाले की, आई, वडील, गुरुजी व वडिलधा-यांची आज्ञा पाळा, मोठे व्हा व देशाचे सुजान नागरिक बना. विदयार्थी हे आपले फक्त पाल्य नसून आपली मुले आहेत असे मानून त्यांच्यावर संस्कार करून अध्यापन करावे असा मोलाचा संदेश जगद्गुरुंनी सर्व शिक्षकवृंदाला दिला. आपल्या प्रभावशाली व ओघवती वाणीतून गुरुवर्यांनी विविध दाखल्यांच्या माध्यमातून प्रवचनाद्वारे उद्बोधन केले. 
      जुन्नर तालुक्याचे माजी आमदार मा. बाळासाहेब दांगट यांनी धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या बहुमोल कार्याचा गौरव म्हणून त्यांना *“जीवनगौरव पुरस्कार”* हा महासन्मान जगद्गुरु परमहंस आचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते व संयुक्त तत्वावधान संत प्रमुखांच्या उपस्थितीत, सन्मानपत्र देवून दांगट कुटुंबियांसमवेत प्रदान करण्यात आला.

               *“काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती |*
                *अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती”* 
या विचाराचा परामर्श घेत शिवजन्मभूमी व शिवछत्रपतींच्या कार्याचा गौरव करीत मा.आमदार बाळासाहेब दांगट यांनी उद्धृत केले की, आजचा हा अमृतयोग आहे. जगद्गुरु परमहंस आचार्यजी व त्यांचे सहयोगी संत आपल्या भूमीमध्ये अवतरले आहेत हे आपले महतभाग्य आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, सद्गुरू चैतन्य स्वामी, संत जनाबाई आदी महान विभूतींच्या प्रेरणेने आणि पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. असं सांगून ते पुढे म्हणाले की, ह.भ.प.नामदेव महाराज हरड यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होत असताना उपस्थित सर्व आबालवृद्ध, नेतेगण उपस्थित भाविकांना आज जगद्गुरुंच्या सहवासाचा, चरणस्पर्शाचा व आशिव-चन श्रवणाचा लाभ होत आहे याचा मला अंत:करणापासून आनंद होत आहे.
      याप्रसंगी जगद्गुरु परमहंस आचार्यजी महाराज यांचे समवेत सहयोगी संत कुंभमेळा समिती नाशिक व सिह्स्थ मूळ कुंभमेळा अध्यक्ष महंत रामनारायणदासजी, श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी बाळानंद सरस्वतीजी, आयोध्या छावणीपिठ खजिनदार श्री एकनाथजी महाराज, श्रीश्री १०८ शिवगिरीजी महाराज - जुना अखाडा ओंकारेश्वर, श्रीश्री स्वामी विजयानंदजी महाराज – दशनाम अखाडा व आळंदी वारकरी शिक्षण संस्था ह.भ.प. सुभाष महाराज पवार व इतर धर्मगुरू संत महंत उपस्थित होते.
      यावेळी शंकरशेठ दांगट, भरतशेठ दांगट, द.भा.दांगट गुरुजी, सौ. रंजनाताई दांगट, सौ. जयश्रीताई दांगट, महिला वर्ग, दांगट भावकी, तालुक्यातील जेष्ठ श्रेष्ठ विविध पक्षांचे नेतेगण, पंचक्रोशीतील अनेक भाविकभक्त, विद्यार्थ्यांचे पालक भक्तिभावाने उपस्थित होते.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मंदाकिनी दांगट व सूत्रसंचालन भरतकुमार तांबे यांनी केले. शिवप्रेरणा शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी यांचे मोलाचे सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास लाभले. मोठ्या उत्साहाने आणि प्रेरणादायीपणे पार पडलेला हा कार्यक्रम जगद्गुरुंच्या आशिर्वचन व चरणस्पर्शानंतर महाप्रसादाचा लाभ घेऊन यशस्वीपणे पार पडला.
-----------------------------------
आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...