उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )सामाजिक कार्यकर्ते तथा साईभक्त धनराज पाटील यांनी राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित केलेल्या रक्तदाब शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे उदघाटन स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद सदाशिव साबळे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी ज्वालासिंह देशमुख स्वराज्य संघटना करंजाडे,अतिष साबळे ग्रामपंचायत सदस्य, कुणाल जाधव, नितीन ओंबळे, गणेश पोशा कोळी, भगवान म्हात्रे, विंधणे खालचा पाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कोळी, जयराम पाटील,केतन पाटील, विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या मनोगतातून बोलताना विनोद साबळे म्हणाले की, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी विज्ञान रक्ताची निर्मिती अजून करू शकले नाही, त्यामुळे धनराज पाटील चा आदर्श घेऊन सर्व तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज पाटील, निवास पाटील सुनिल वर्तक, सुनील पाटील,अमित पाटील,अनुज पाटील,यश पाटील, मिलिंद पाटील आणि धनराजच्या परिवाराने विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे दिवसभराचे निवेदन, सुप्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक, जीवन डाकी आणि दिपक पाटील यांनी केले.एकंदरीत सदर रक्तदान शिबीर मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा