आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

संविधान बचाव यात्रेचे पनवेल शहरामध्ये भव्यदिव्य स्वागत

पनवेल : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, न्याय, समानता यावर आधारीत जे संविधान दिले ते संविधान विद्यमान सरकारद्वारे बदलण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे त्याविरोधात बाबासाहेबांचे नातू, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काका खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राभर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या निर्धारित पथमार्गाने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सध्या ही यात्रा कोकण विभागात आगेकूच करत कामोठे - खारघर - कळंबोली - खांदा कॉलनी विभागाअंतर्गत पनवेल या शहरात दि. ०२ डिसेंबर रोजी दाखल झाली असता भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत यात्रेकगे मोठ्या उत्साहात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.
  सदर यात्रेस बौद्धजन पंचायत समितीचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष अंकुश सकपाळ, कोषाध्यक्ष व विभाग क्र. ५६ चे विभाग प्रतिनिधी नागसेन गमरे, चिटणीस प्रमोद सावंत, रवींद्र शिंदे, निवडणूक मंडळ अध्यक्ष मिलिंद जाधव तसेच वंचित बहुजन आघाडी, बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा आणि समाजातील विविध समित्या, गट, संस्था, महिला मंडळ तसेच कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी या विभागातील सर्व शाखा, त्यांचे पदाधिकारी, आजी माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते; विभाग प्रतिनिधी नागसेन गमरे यांनी बौद्धजन पंचायत समिती विभाग क्र. ५६ च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपस्थितांचे स्वागत केले.
   सदर प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना "भाजप सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, न्याय, समानता या तत्वाधारीत दिलेले भारतीय प्रजासत्ताक राष्ट्राचे संविधान बदलून किंवा त्याला बगल देऊन मनुवादी संविधान आणण्याचे प्रयत्न करीत आहेत, विद्यमान सरकारमधील मंत्री जरी संविधान कोणी बदलू शकत नाही असे म्हणत असले तरी सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून सर्व सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण करून संविधान कालबाह्य करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे त्यामुळे आताच आपण सावध होऊन संविधान बचाव करण्यासाठी पुढे आले पाहिजे" असे प्रतिपादन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...